सेझवान फ्राइड राईस | Schezwan Fried Rice Recipe in Marathi

प्रेषक Jaya Rajesh  |  10th Nov 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Schezwan Fried Rice by Jaya Rajesh at BetterButter
सेझवान फ्राइड राईसby Jaya Rajesh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

271

0

सेझवान फ्राइड राईस recipe

सेझवान फ्राइड राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Schezwan Fried Rice Recipe in Marathi )

 • 2 वाटी धुतलेले आणि भिजवलेले लांब दाण्याचे बासमती तांदूळ
 • 1/2 वाटी चिरलेले कांदे
 • 1-2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या
 • 1/2 वाटी प्रत्येकी चिरलेले गाजर, फरसबी, कोबी आणि भोपळा मिरची
 • 1 लहान चमचा प्रत्येकी तेल आणि लिंबाचा रस
 • मीठ स्वादानुसार
 • सॉस बनविण्यासाठी :
 • 5-6 लाल मिरच्या, बिया काढलेल्या आणि गरम पाण्यात भिजवलेल्या (15 मिनिटांसाठी)
 • 1 मोठा चमचा प्रत्येकी चिरलेला लसूण आणि आले
 • 2-3 लहान कांद्याच्या पाती चिरलेल्या
 • 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस
 • 1 लहान चमचा डार्क सोया सॉस
 • 1/3 लहान चमचा साखर आणि मिरपूड
 • 1/2 लहान चमचा लिंबाचा रस
 • 2 मोठे चमचे तेल

सेझवान फ्राइड राईस | How to make Schezwan Fried Rice Recipe in Marathi

 1. सॉस तयार करण्याची पद्धत:-
 2. भिजवलेल्या लाल मिरच्या वाटून बारीक पेस्ट करा. एका कढईत तेल गरम करा आणि त्यात आले आणि लसणाची पेस्ट घालून चांगले परता. एकदा त्याचा उग्र वास गेला की त्यात वाटलेली पेस्ट घाला आणि तेल सुटेपर्यंत परता. एकदा तेल सुटणे सुरु झाले की त्यात सोया आणि टोमॅटो सॉस घाला आणि पुन्हा चांगले परता.
 3. सोय सॉसमध्ये मीठ अधिक प्रमाणात असते त्यामुळे परतताना थोडे मीठ घाला आणि व्यवस्थित मिसळा. नंतर त्यात साखर आणि मिरपूड घाला. शेवटी त्यात लिंबाचा रस घाला आणि गॅस बंद करा.
 4. भात तयार करण्यासाठी 2 वाट्या तांदूळ धुवून 30 मिनिटांसाठी भिजवून ठेवा. नंतर 30 मिनिटांनी पाणी गाळून घ्या.
 5. एका भांड्यात 5-6 कप पाणी उकळायला ठेवा. त्यात एक चिमुट मीठ, 2-3 थेंब तेल आणि लिंबाचा रस घाला. पाण्याला एक उकळी आली की मग, त्यात तांदूळ घालून कच्चे पक्के शिजवा. गॅस बंद करून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.
 6. फ्राइड राईस बनविण्यासाठी, एक जाड तळ असलेले पातेले घ्या, त्यात तेल गरम करा आणि चिरलेला लसूण आणि कांदा घालून परता. त्याचा उग्र वास गेला की, त्यात चिरलेल्या भाज्या घालून काही वेळ परता. (भाज्या अधिक शिजवू नका आपल्या फ्राइड राईसमध्ये त्याचा कुरकुरीतपणा राहिला पाहिजे.)
 7. नंतर तयार केलेले सॉस घाला आणि चांगले हलवा ज्यामुळे भाज्यांवर सॉस छान से लागेल. एकदा सॉस छान लागले की, त्यात हळूहळू भात घाला आणि हलवा. त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवा. 5 मिनिटांनंतर झाकण काढून चांगले हलवा.
 8. नंतर त्यात एक चिमुट मीठ आणि मिरपूड घाला आणि चांगले मिसळा.
 9. सेझवान फ्राइड राईस तयार आहे! सेलेरीच्या पानांने सजवा आणि गरमागरम वाढा.

My Tip:

हा सॉस फ्रीजमध्ये स्टोर करू शकता आणि आवश्यकतेनुसार वापरू शकता. मी सहसा हे एक दिवस अगोदर बनविते आणि दुसऱ्या दिवशी वापरते.

Reviews for Schezwan Fried Rice Recipe in Marathi (0)