छोले भटुरे | Chole Bhature Recipe in Marathi

प्रेषक Anju Bhagnari  |  8th Mar 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chole Bhature by Anju Bhagnari at BetterButter
छोले भटुरे by Anju Bhagnari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

658

0

छोले भटुरे recipe

छोले भटुरे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chole Bhature Recipe in Marathi )

 • भटुऱ्यां साठी - 2 वाट्या मैदा
 • अर्धा कप दही (मऊ पीठ मळण्यासाठी गरजेनुसार)
 • मीठ स्वादानुसार
 • तेल 1 मोठा चमचा
 • काबुली चणे छोल्यांसाठी- 2 वाट्या
 • कांदे, 2 मोठे काप बनविलेले
 • टोमेटो, 2 चिरलेले
 • हिरवी मिरची 1
 • आले लसणाची पेस्ट 1 लहान चमचा
 • लाल मिरची पूड 1 लहान चमचा
 • जिरेपूड 1 लहान चमचा
 • धणेपूड 1 लहान चमचा
 • गरम मसाला 1 लहान चमचा
 • हळद अर्धा लहान चमचा
 • छोले मसाला 1 लहान चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • पाणी गरजेनुसार
 • तेल तळण्यासाठी
 • लिंबाच्या फोडी आणि गोल कापलेला कांदा - वाढण्यासाठी

छोले भटुरे | How to make Chole Bhature Recipe in Marathi

 1. छोले पाककृती- 2 वाट्या छोले रात्रभर भिजवून ठेवा.
 2. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात मीठ, अर्धा लहान चमचा लाल तिखट, 1/4 लहान चमचा हळद, अर्धा लहान चमचा गरम मसाला घाला.
 3. मोठ्या विस्तवावर 4-5 कप पाणी घालून प्रेशर कूकरमध्ये 3 शिट्या होईपर्यंत शिजवा.
 4. ते मऊ होतील आणि 95% शिजतील.
 5. रस्सा बनविण्यासाठी, एका प्रेशर कूकरमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा.
 6. कापलेला कांदा घाला.
 7. मंद विस्तवावर 10 मिनिटे बदामी रंगाचा होईपर्यंत परता. अधूनमधून हलवत रहा.
 8. 1 लहान चमचा जिरेपूड, मीठ, 1 लहान चमचा धणेपूड, अर्धा लहान चमचा गरम मसाला, अर्धालहान चमचा लाल तिखट, 1 लहान चमचा छोले मसाला आणि 1 लहान चमचा आले लसणाची पेस्ट यांच्यासारखे सुके मसाले घाला.
 9. 1 मिनिट तळा आणि नंतर त्यात टोमॅटो आणि हिरवी मिरची घाला.
 10. टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत तळा.
 11. 1 कप पाणी घाला.
 12. मोठ्या विस्तवावर 1 शिटी होईपर्यंत शिजवा.
 13. शिजल्यानंतर काढून घ्या, नंतर हँड ब्लेन्डरने रश्श्याला एकजीव करा.
 14. हे याप्रमाणे दिसेल.
 15. एका भांड्यात शिजवलेले छोले घालून मंद विस्तवावर 10 मिनिटांसाठी तळण्यासाठी झाकण लावून ठेवा.
 16. त्यात 1 कप पाणी घालून 1 शिटी होईपर्यंत शिजवा, जेणेकरून छोल्यांना रश्श्याचा सुगंध येईल.
 17. प्रेशर आपणहून कमी होऊन झाकण उघडू द्या आणि वाढण्यासाठी छोले तयार आहेत.
 18. भटुरे बनविण्याची कृती - एका मोठ्या वाडग्यात मैदा, दही, स्वादानुसार मीठ आणि 1 लहान चमचा तेल घ्या.
 19. मऊ कणिक मळा.
 20. 3 तासांपर्यंत (उन्हाळ्यात) किंवा 5 तासांपर्यंत (हिवाळ्यात) त्याला न हलविता ते किंचित फुलेपर्यंत बाजूला ठेवा.
 21. भटुरे तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करा.
 22. दरम्यान, पीठाचे छोटे गोळे घ्या आणि पुरी/पोळीसारखे लाटा.
 23. कणिक मऊ झाले असल्यामुळे, लाटताना लावण्यासाठी कोरडे पीठ वापरा.
 24. मंद किंवा मध्यम विस्तवावर तळा.
 25. खाचा असलेल्या चमच्याने दाबा, जेणेकरून भटुरे फुलतील.
 26. दोन्ही बाजू बदामी रंगाचे होईपर्यंत तळा.
 27. टिश्यु पेपरवर काढा, ज्यामुळे त्यातील अतिरिक्त तेल निघून जाईल. गरमागरम वाढा.

My Tip:

रश्श्याची सुसंगतता आणि चटणी जरुरीनुसार बनवावी.

Reviews for Chole Bhature Recipe in Marathi (0)