चीजी स्वीटकॉर्न ग्रिल्ड सँडविच | Cheesy Sweetcorn grilled sandwiches Recipe in Marathi

प्रेषक Lubna Karim  |  12th Oct 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Cheesy Sweetcorn grilled sandwiches by Lubna Karim at BetterButter
चीजी स्वीटकॉर्न ग्रिल्ड सँडविच by Lubna Karim
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6364

0

चीजी स्वीटकॉर्न ग्रिल्ड सँडविच recipe

चीजी स्वीटकॉर्न ग्रिल्ड सँडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheesy Sweetcorn grilled sandwiches Recipe in Marathi )

 • 4 - ब्राऊन ब्रेडचे काप
 • 3 मोठे चमचे मक्याचे दाणे
 • 2 मोठे चमचे वितळविलेले लोणी
 • 1 मोठा चमचा - चौरस कापलेली भोपळा मिरची
 • 1 मोठा चमचा - चौरस कापलेला टोमॅटो
 • 1 मोठा चमचा मिरपूड
 • 1 मोठा चमचा ओरेगॅनो
 • 2 मोठे चमचे किसलेले मोझरेला चीज
 • मीठ चवीनुसार

चीजी स्वीटकॉर्न ग्रिल्ड सँडविच | How to make Cheesy Sweetcorn grilled sandwiches Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात मक्याचे दाणे, भोपळा मिरची, टोमॅटो, मिरपूड, ओरेगॅनो आणि मीठ घाला. यांना टॉस करून एकजीव करा.
 2. ब्रेडच्या दोन तुकड्यांच्या एका बाजूला लोणी लावा आणि दुसऱ्या बाजूला जेथे लोणी लावलेले नाही, त्यावर तयार केलेले मिश्रण ठेवा.
 3. आता त्यावर मोझरेला चीज घाला आणि उरलेले दोन ब्रेडचे तुकड्यांना लोणी लाऊन ठेवा.
 4. निदेशपुस्तिकेत दिलेल्या सुचनेनुसार, एका सँडविच मेकरला ग्रिल प्लेट लावून गरम करा. नंतर या तयार केलेल्या सँडविचला ग्रिलवर ठेवा आणि कुरकुरीत आणि बदामी रंगाचे होईपर्यंत 4-5 मिनिटे ग्रिल करा.
 5. त्यांना तिरपे कापा आणि टोमॅटो सॉसबरोबर गरमगरम खायला द्या.

My Tip:

जर तुमच्या मुलांना टोमॅटो आणि भोपळा मिरची आवडत नसेल तर त्यांना वगळू शकता.

Reviews for Cheesy Sweetcorn grilled sandwiches Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती