इडली | Idli Recipe in Marathi

प्रेषक Sonu   |  24th Sep 2017  |  
1 from 2 reviews Rate It!
 • Photo of Idli by Sonu at BetterButter
इडली by Sonu
 • तयारी साठी वेळ

  20

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

384

2

इडली recipe

इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idli Recipe in Marathi )

 • सव्वा वाटी उडीदडाळ (सालरहित)
 • 3 वाटी तांदूळ (तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, परंतु तुकडा तांदूळ वापरा, बासमतीसारखे अख्खे दाणे नव्हेत)
 • 2 लहान चमचे मीठ
 • पाणी वाटण्यासाठी, आवश्यकतेनुसार

इडली | How to make Idli Recipe in Marathi

 1. तांदूळ आणि डाळ वेगवेगळे धुवा आणि भिजवून ठेवा.
 2. रात्रभर सुमारे 8 ते 9 तास भिजवून ठेवा.
 3. आता डाळ आणि तांदूळ एक बारीक पेस्टमध्ये वेगवेगळे वाटून घ्या.
 4. आता दोन्ही मिसळा आणि त्यात मीठ टाका.
 5. ते मिश्रण किमान 6 ते 7 तास आंबवण्यासाठी बाजूला काढून ठेवा.
 6. एका प्रेशर कुकरमध्ये सुमारे 1 ग्लास पाणी गरम करा.
 7. इडली स्टँडला नीट तेल लावा आणि प्रत्येक पोकळीत एक पळी भरून ते मिश्रण ओता.
 8. ते स्टँड प्रेशर कुकरमध्ये ठेवा.
 9. ते प्रेशर कुकर झाकणाने बंद करा, परंतु त्यावर शिटी ठेवू नका.
 10. मोठ्या ज्वालेवर 10 ते 12 मिनिटे शिजवा आणि विस्तव बंद करा.
 11. आता 5 मिनिटांसाठी त्याला स्थिर होऊ द्या आणि नंतर कुकरमधून तो स्टँड बाहेर काढा.
 12. पुन्हा 5 मिनिटे वाट पहा आणि एका चमच्याने त्या पोकळींमधून इडल्या काढून घ्या.
 13. खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा गरमागरम सांबारबरोबर वाढा.

My Tip:

इडल्या मुलायम आणि सुच्छिद्र होण्यासाठी मिश्रण योग्य रीतीने आंबवले पाहिजे.

Reviews for Idli Recipe in Marathi (2)

Madhuri Sawanta year ago

Yemmy
Reply

namita desai2 years ago

sabar recipe havi aahe.. plz share kara
Reply