मुख्यपृष्ठ / पाककृती / वॉटरमेलन आईस्ड टी

Photo of Watermelon Iced Tea by Moumita Malla at BetterButter
2326
68
5.0(0)
0

वॉटरमेलन आईस्ड टी

Jan-17-2016
Moumita Malla
5 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • लो कोलेस्टेरॉल
  • लो कॅलरी
  • लो फॅट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाणी - 3 कप
  2. चहाच्या बॅगा - 4
  3. कलिंगड - लहान तुकडे करा (6 वाट्या)
  4. मध - 2 मोठे चमचे
  5. लिंबाचा रस - 1 पूर्ण लिंबू

सूचना

  1. मध्यम सॉस पॅनमध्ये 3 कप पाणी घेऊन उकळवा. चहाच्या बॅग्ज घाला आणि आचेवरून खाली उतरवा. आणि 5 मिनिटांसाठी ते बुडवून ठेवा. आता त्यातून चहाच्या बॅग्ज काढून घ्या आणि त्यात मध मिसळा. चहा एका उष्णता-रोधक भांड्यात काढा आणि कमीत कमी 1 तास थंड करा.
  2. दरम्यान, एका ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसरमध्ये कलिंगडाचा रस तयार करा. एका गाळणीने गर दाबून रस गाळून घ्या. गर काढून टाका.
  3. कलिंगडाचा आणि लिंबाचा रस चहाच्या मिश्रणात मिसळा आणि चांगले हलवा.
  4. वाढण्यासाठीचे ग्लास घ्या, अर्धा ग्लास बर्फाचे तुकडे घाला (आईस टीची खरी चव ती थंडगार असेल तरच येते, म्हणून वाढण्याअगोदर त्यात भरपूर बर्फाचे तुकडे घाला) नंतर कलिंगडाचा चहा त्यात ओता.
  5. कलिंगडाच्या तुकड्यांनी सजवा आणि थंडगार वॉटरमेलन आईस्ड टीचा आनंद घेऊन ताजेतवाने व्हा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर