पालक पनीर पिनव्हील्स | Palak Paneer Pinwheels Recipe in Marathi

प्रेषक sapana behl  |  23rd Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Palak Paneer Pinwheels by sapana behl at BetterButter
पालक पनीर पिनव्हील्स by sapana behl
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2088

0

Video for key ingredients

  पालक पनीर पिनव्हील्स

  पालक पनीर पिनव्हील्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak Paneer Pinwheels Recipe in Marathi )

  • 200 ग्रॅम्स पालक, बारीक चिरलेला
  • 1 वाटी किंवा 100 ग्रॅम्स पनीरचे तुकडे
  • 1 मोठा चमचा साधे पीठ, शिंपडण्यासाठी.
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 2-3 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या
  • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1 बारीक चिरलेला टोमॅटो
  • 1/2 लहान चमचा गरम मसाला
  • 1 गोठविलेली पफ पेस्ट्री शीट, नरम झालेली
  • 2 मोठे चमचे आणि थोडे अधिक ऑलिव्हचे तेल ब्रशने पिनव्हील्सना लावण्यासाठी
  • मीठ स्वादानुसार

  पालक पनीर पिनव्हील्स | How to make Palak Paneer Pinwheels Recipe in Marathi

  1. एका कढईत तेल ऑलिव्हचे तेल गरम करा. त्यात कांदा आणि लसूण घालून एक मिनिट परता. आता त्यात हिरवी मिरची, टोमॅटो, मीठ, हळद, धणेपूड घालून पुन्हा 1 मिनिट परता. आता चिरलेला पालक घाला आणि झाकून 2 मिनिटे शिजवा.
  2. शेवटी कुस्करलेले पनीर घाला, झाकल्याशिवाय 5 मिनिटे किंवा ओलावा निघून जाईपर्यंत शिजवा. वरून गरम मसाला शिंपडा आणि सारण थंड होऊ द्या. ओव्हन 180 अंश सेल्सियसवर प्रीहीट करा.
  3. काम करण्याच्या जागी थोडे कोरडे पीठ शिंपडा आणि पफ पेस्ट्रीला लाटून थोडी अधिक लांबी वाढवा. तयार केलेले सारण पफ पेस्ट्री शीटवर कडेपासून 1 इंच सोडून पसरवा.
  4. आता याला लहान भागापासून गोलाकारात शेवटपर्यंत दुमडा. आता एक बेकिंग पेपर किंवा पर्चमेंट पेपर ठेवा. नंतर रोलचे गोल काप करा. काप बेकिंग शीटवर आडवे ठेवा. त्यावर ब्रशने ऑलिव्हचे तेल लावा.

  Reviews for Palak Paneer Pinwheels Recipe in Marathi (0)