मुख्यपृष्ठ / पाककृती / उन्हाळा स्पेशल नाश्ता कैरीची डाळ

Photo of KAIRI dal by Chayya Bari at BetterButter
1012
6
0.0(0)
0

उन्हाळा स्पेशल नाश्ता कैरीची डाळ

Dec-17-2017
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उन्हाळा स्पेशल नाश्ता कैरीची डाळ कृती बद्दल

तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल अशी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजवलेली व वाटलेली हरबरा डाळ दीड वाटी
  2. कैरीचा किस पाऊण किंवा आंबट असेल तर १/२ वाटी
  3. हिरवी मिरची पेस्ट १/२ चमचा
  4. मीठ चवीपूरते
  5. जिरे मोहरी कढीपत्ता फोडणीसाठी
  6. हिंग १/२चमचा
  7. साखर २चमचे
  8. तेल २चमचे फोडणीसाठी
  9. हळद किंचित
  10. कोथिंबीर बारीक कापून
  11. खोबऱ्याचा किस सजावटीसाठी

सूचना

  1. हरबऱ्याची डाळ 6 तास भिजवावी
  2. ती निथळून घ्यावी
  3. मग मिक्सरवर मध्यम जाडसर वाटावी
  4. खूप बारीक किंवा खूप जाड नसावी
  5. मिरची वाटून घ्यावी
  6. मग डाळ कैरीचा किस साखर मीठ एकत्र कालवावे
  7. तेल तापवून जिरे मोहरी कढीपत्ता हिंग हळद घालून फोडणी करावी मिरची पेस्ट टाकून मंद गॅसवर परतून घ्यावे
  8. हि फोडणी डाळ व कैरीच्या मिश्रणावर ओतावी
  9. नीट हलवून कोथिंबीर खोबऱ्याचा किस घालून सर्व्ह करावी
  10. गार आवडत असेल तर सर्व्ह करण्यापूर्वी १०मिनिटे फ्रिज मध्ये ठेवावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर