बीट पुलाव | Beet root pulav Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  20th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Beet root pulav by Rohini Rathi at BetterButter
बीट पुलावby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

बीट पुलाव recipe

बीट पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet root pulav Recipe in Marathi )

  • बासमती तांदूळ 1 कप
  • किसलेले बीट एक कप
  • तालीम वाटाणे आर्धा कप
  • कांदा एक
  • आलेल्या त्याची पेस्ट एक टिस्पून
  • लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  • धने एक टिस्पून
  • हाळदी अर्धा टीस्पून
  • कोथंबीर बारीक चिरलेली
  • मीठ चवीनुसार
  • फोडणीसाठी
  • तेल दोन टेबल स्पून
  • दालचिनी एक तुकडा
  • विलायची 1
  • लवंग 1
  • बडीशोप अर्धा टीस्पून

बीट पुलाव | How to make Beet root pulav Recipe in Marathi

  1. प्रथम बासमती चावल स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवावा
  2. कुकर गरम करून त्यात तेल टाकून फोडणी द्यावी
  3. त्यात चिरलेला कांदा वाटाणा किसलेला बीट आले-लसणाची पेस्ट घालून मध्यम आचेवर परतून घ्यावे परतून घ्यावे
  4. नंतर त्यात हळदी पावडर लाल मिरची पावडर घालून हालवावे
  5. नंतर पाणी घालून उकळी आल्यानंतर भिजवलेले तांदूळ वरील मिश्रणात एकत्र करून घ्यावे
  6. पंधरा मिनटे कमी गॅसवर शिजवून कूकरच्या दोन शिट्या घ्याव्या
  7. तयार बीट पुलाव वर बारीक चिरलेली कोथंबीर घालू गरम-गरम सर्व करावा

Reviews for Beet root pulav Recipe in Marathi (0)