मैसूर पाक | Mysore Pak Recipe in Marathi

प्रेषक Sakshi Khanna  |  24th Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mysore Pak by Sakshi Khanna at BetterButter
मैसूर पाक by Sakshi Khanna
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2375

0

मैसूर पाक recipe

मैसूर पाक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mysore Pak Recipe in Marathi )

 • अर्धा कप पाणी
 • 2 वाट्या तूप
 • 2 वाट्या साखर
 • 1 वाटी बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ)

मैसूर पाक | How to make Mysore Pak Recipe in Marathi

 1. एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप गरम करा. त्यात बेसन घालून मध्यम आचेवर काही मिनिटे भाजा आणि बाजूला ठेवा.
 2. एका दुसऱ्या पॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करा. एक तारी पाक होईपर्यंत उकळवा.
 3. त्या पाकात भाजलेला बेसन थोडा-थोडा करून घाला आणि निरंतर हलवीत रहा.
 4. दुसऱ्या पॅनमध्ये उरलेले तूप गरम करा आणि त्याला बेसनमध्ये थोडे थोडे करून घाला, जेणेकरून बेसन शिजत राहील.
 5. या पूर्ण मिश्रणाला अजून काही मिनिटे परता आणि अगोदरपासून तूप लावलेल्या ताटात घाला.
 6. मिश्रणाला उलथन्याने एकसारखे पसरवा. नंतर याला थंड होऊ द्या आणि आवडीच्या आकारात कापा.

Reviews for Mysore Pak Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo