बीट सूप | BEET soup Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  31st Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of BEET soup by Chayya Bari at BetterButter
बीट सूपby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

10

0

5 votes
बीट सूप recipe

बीट सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BEET soup Recipe in Marathi )

  • बीट किसून १मोठी वाटी
  • मीठ चवीपुरते
  • जिरे पावडर १/२चमचा
  • मिरपूड चवीला
  • कॉर्नफ्लोअर पेस्ट १/२चमचा
  • बटर १चमचा
  • लिंबाचा रस १/२चमचा ऐच्छिक
  • साखर १/२चमचा लिंबाचा रस वापरला तर

बीट सूप | How to make BEET soup Recipe in Marathi

  1. प्रथम बटर टाकून बीट किस परतून घ्यावा
  2. थोडे पाणी टाकून ५ मिनिटे शिजवून घ्यावे
  3. थोडा गार झाला की मिक्सरवर फिरवून घ्यावा
  4. मग चांगली पेस्ट तयार होत्ये
  5. त्यात १ते१.५वाटी पाणी टाकून उकळायला ठेवावा
  6. कॉर्नफ्लोअर पाण्यात पेस्ट करून त्यात मिक्स करावे
  7. सतत ढवळावे
  8. मग मीठ व जिरेपूड घालून ५ते७ मिनिटे उकळी घ्यावी
  9. लिंबाचा रस व साखर पाहिजे तर घालावे
  10. मग बाऊल मध्ये काढून मिरपूड भुरभुरावी
  11. फेटलेलं क्रिम घालून गरमच प्यायला द्यावे

My Tip:

हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच आबाल वृद्धांसाठी फायदेशीर

Reviews for BEET soup Recipe in Marathi (0)