मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा साल्सा व काप

Photo of Potato Salsa n Finger sticks by Renu Kulkarni at BetterButter
952
7
0.0(0)
0

बटाटा साल्सा व काप

Jan-05-2018
Renu Kulkarni
50 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा साल्सा व काप कृती बद्दल

दोन जेवणामधील खाणे हे चवदार तर हवेच पण पौष्टिक व हलके पण हवे.. हा प्रकार आपली भूक तर भागवतोच व उर्जा देत पुढील काम करायला उत्साही ठेवतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. घट्ट दही 1 वाटी
  2. उकडलेला बटाटा 1 मोठा
  3. चिरून कांदा 1/2 वाटी
  4. चिरलेली कोथिंबीर 1/2 वाटी
  5. चिरलेली हिरवी मिरची 2
  6. साखर 1 टीस्पून
  7. मीठ 1/2 टीस्पून
  8. मोहरीची फोडणी 2 टीस्पून
  9. काकडी चे ऊभे काप 1 वाटी
  10. गाजराचे ऊभे काप 1 वाटी
  11. तळलेले पापड तुकडे 1 वाटी
  12. थालीपीठ भाजणी 1 वाटी
  13. तिखट. ..मीठ 1/2 टीस्पून
  14. हळद 1/4 टीस्पून
  15. तीळ 2 टीस्पून
  16. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

  1. थालीपीठ भाजणी मधे तिखट. .मीठ. .हळद व तिळ घालून पीठ भिजवावे.
  2. एक थालीपीठ थापून कुरकुरीत खमंग भाजून घ्या.
  3. थालीपीठ च्या लांब सळ्या करून घ्या.
  4. बटाटा कुस्करून त्यात कांदा. ..मिरची. ..कोथिंबीर घालून मिक्स करावे.
  5. मग त्यात फेटलेले दही..साखर. .मीठ घालावे व मिक्स करावे.
  6. शेवटी फोडणी घालून शोभिवंत भांड्यात काढून घ्या.
  7. काकडी. ..गाजर. .पापड..व थालीपीठ पण वेगवेगळ्या भांड्यात काढून घ्या.
  8. सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर