मुख्यपृष्ठ / पाककृती / AAMBA MODAK

Photo of AAMBA MODAK by Savita Sarpotdar Deshpande at BetterButter
70
6
0.0(1)
0

AAMBA MODAK

Jan-08-2018
Savita Sarpotdar Deshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. एक खोवलेला नारळ
 2. दीड वाट्या हापूस आंब्याचा रस/ फ्रोजन आंबा रस
 3. पाऊण वाटी साखर
 4. 1 वाटी सुवासिक तांदूळ पिठी
 5. अर्धी वाटी पाणी
 6. 2 टीस्पून साजूक तूप
 7. चिमूटभर मीठ
 8. 5-6 केशराच्या काड्या - ऐच्छिक
 9. भाजलेली खसखस 1 टीस्पून

सूचना

 1. खोवलेला नारळ, साखर, भाजलेली खसखस आणि 1 वाटी हापूस आंब्याचा रस एकत्र करून मंद आचेवर शिजवा. साखर विरघळून मिश्रण घट्टसर झाले की सारण तयार
 2. अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी रस एकत्र उकळत ठेवा. त्यात चिमूटभर मीठ आणि तूप घाला. हवे असतील तर केेशर घाला
 3. उकळी आली की त्यात तांदळाची पिठी घालून व्यवस्थित ढवळा आणि झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवा. गैस बंद करून 5 मिनिटे उकड तशीच राहूदे.
 4. आता ही उकड परातीत घेऊन छान मऊसूत मळा
 5. लहान लिंबा एव्हढे गोळे करून घ्या
 6. एक गोळा घेऊन त्याला वाटीचा आकार द्यावा
 7. त्यात 2 टीस्पून सारण घाला
 8. मोदका साठी सुरेख मुखऱ्या करा. म्हणजे कडेने चिमट्या करा
 9. मोदक पात्रात किंवा कुकरमध्ये शिटी न लावता 15 मिनिटे वाफवा
 10. प्रत्येक मोदकावर भरपूर तूप घालून बाप्पाला नैवेद्य दाखवून स्वतः पण इतरांबरोबर गट्ट करा
 11. असे सुरेख मोदक तयार होतील

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Minal Sardeshpande
Jan-08-2018
Minal Sardeshpande   Jan-08-2018

मस्त आमच्याकडे करतात माझी लिहायची राहिलीय तुझे खूप सुंदर झालेत

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर