मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर हलवा रोल

Photo of Gajar Halwa Roll by Aarti Nijapkar at BetterButter
931
9
0.0(0)
0

गाजर हलवा रोल

Jan-12-2018
Aarti Nijapkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा रोल कृती बद्दल

गाजर हलवा म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता गोड पदार्थ. आपण फक्त कारण शोधत असतो गाजर हलव्याचा बेत करण्यासाठी. पण मी थोडसं वेगळ करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला नक्की आवडेल. खजूराच्या पाकात गाजर हलवा शिजवून ब्रेडच्या स्लाइस मध्ये भरुन तेलात तळणार आहोत. चला तर साहित्य व कृती कडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. किसलेला गाजर ४ ते ५ मोठे
  2. तूप ५० ग्रॅम
  3. मावा ५० ग्रॅम
  4. बारीक कापलेले बदाम,पिस्ते,काजू १ मोठा चमचा
  5. वेलची पूड १ लहान चमचा
  6. ओले खजूर बी नसलेले १०० ग्रॅम
  7. पाणी २ कप किंवा आवश्यकतेनुसार
  8. मध २५ मिली
  9. केसर दूध मसाला १ मोठा चमचा
  10. दूध १/२ कप
  11. ब्रेडचे स्लाइस ८ ते १०
  12. ब्रेड क्रम्स १ कप
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम एका कढईत खजूर व पाणी एकत्र करुन उकळत ठेवा मंद आचेवर
  2. एका कढईत गाजरचा किस घालून चांगल परतवून घ्या. गाजराचे पाणी सूकत आले की तूप , मावा व बारीक केलेले बदाम , पिस्ते, काजू घाला व तूपात छानसं परतवून घ्या
  3. आता खजूर चांगल शिजल्यावर आच बंद करा मग थंड करुन खजूराची पेस्ट बनवून घ्या
  4. ही पेस्ट आणि खजूराचे पाणी एकत्र करुन घ्या मग गाजराच्या कढईत घाला मिश्रण एकत्र करुन गाजर शिजवून घ्या ८ ते १० मि. मंद आचेवर वाफवून घ्या.
  5. गाजर शिजल्यावर त्यात केसर दूध मसाला , वेलची पूड व मध घालून मिश्रण एकजीव करुन घ्या.
  6. एका ताटात काढून गाजर हलवा थंड करुन घ्या
  7. आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर हलक्या हाताने लाटने फिरवून घ्या
  8. आता लाटलेले ब्रेड स्लाइस कोमट दूधात घोळवून घ्या
  9. मग त्यात गाजर हलवा भरुन त्या ब्रेड स्लाइस बंद करुन गोल वळून घ्या
  10. ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घट्ट वळून घ्या ह्या पद्धतीने सर्व गाजर हलव्याचे गोलाकार रोला बनवून घ्या.
  11. कढईत तेल कडकडीत तापवून घ्या
  12. मंद आचेवर सर्व गाजर हलवा रोल तेलात तळून घ्यावे.
  13. किचन टॉवेल किंवा टिशू पेपर वर काढून एका ताटात ठेवून त्यावर मधाची धार सोडा व गरमागरम गरम भरलेला गाजर हलवा रोलचा आस्वाद घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर