मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळगुळाची पोळी

Photo of Til Gul Poli by Archana Lokhande at BetterButter
1719
5
0.0(0)
0

तिळगुळाची पोळी

Jan-14-2018
Archana Lokhande
900 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळगुळाची पोळी कृती बद्दल

संक्रांतीचा अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. याशिवाय संक्रांतीची मजा नाही. प्रत्येकाची बनवण्याची पध्दत वेगवेगळी असते. मी आपली साधीच केली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ एक कप
  2. मीठ
  3. १-२ चमचे तेल
  4. पाणी
  5. तीळ १५० ग्रँम
  6. गुळ १५० ग्रँम
  7. खोबरे १ कप
  8. शेंगदाणे १/२ कप
  9. खसखस १ चमचा
  10. साजूक तूप
  11. वेलची

सूचना

  1. प्रथम एका परातीत पीठ,मीठ आणि तेल एकत्र मिक्स करून पाणी घालून पीठ छान मळून १०-१५ मिनिटे झाकून ठेवून द्या.
  2. तिळ,शेंगदाणे, किसलेले खोबरे आणि खसखस छान भाजून घ्यावे.
  3. गुळ किसून घ्यावा.
  4. आता मिक्सरवर वेलची घालून सर्व एकत्र वाटून घ्यावे.
  5. आता तवा गरम करण्यासाठी ठेवावा.
  6. पिठ थोडे तेल लावून पुन्हा छान मळून घ्यावे.
  7. कणकेचा गोळा घेऊन त्याची वाटी करून त्यात तिळाच्या सारणाचा गोळा भरून छोटी पोळी लाटून घ्यावी.
  8. लाटलेली पोळी दोन्ही बाजूंनी तूप लावून छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावी.
  9. तयार तिळगुळ पोळी वरून साजूक तूप लावून फस्त करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर