मुख्यपृष्ठ / पाककृती / बुंदीचे लाडू

Photo of Bundiche ladu by pranali deshmukh at BetterButter
2911
8
0.0(0)
0

बुंदीचे लाडू

Jan-18-2018
pranali deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुंदीचे लाडू कृती बद्दल

हा प्रकार जरा किचकट आहे पन लग्न समारंभात हा पदार्थ आवर्जून केल्या जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 500 gr.बेसन
  2. ,500gr.साखर
  3. वेलची पावडर 1 छोटा चमचा
  4. खाण्याचे 1/2 चमचे रंग
  5. तळण्यासाठी तूप किंवा तेल 2 वाट्या

सूचना

  1. डाळीचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या. नंतर त्यात १ टेबलचमचा कडकडीत तुपाचे मोहन घालावे व पीठ भिजवावे.
  2. गुठळी राहू देऊ नये. भज्याचा पिठाइतपत असावे.
  3. नंतर कढईत तूप तापत ठेवावे व बुंदीच्या झाऱ्यावर वरील पीठ थोडे घालून झारा ठोकून बुंदी पाडाव्या.
  4. कढईजवळ कढईच्या उंचीपेक्षा जरा उंच येईल असा पाठ धरावा. पाटावर झारा ठोकावा.
  5. लालसर रंगावर आल्या की बुंदी काढाव्या अशा सर्व बुंदी पाडून घ्याव्या.
  6. प्रत्येक वेळी झारा पाण्याने साफ करून घ्या. साखरेत पाणी घालून एकतारीपेक्षा जरा जास्त असा पाक करावा
  7. पाकात बुंदी टाकाव्या. नंतर बुंदी पाकात मुरल्यावर लाडू वळावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर