मुख्यपृष्ठ / पाककृती / Besan puriche ladu

Photo of Besan puriche ladu by Pranali Deshmukh at BetterButter
0
4
5(1)
0

Besan puriche ladu

Jan-19-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 कप बेसन
  2. 1 कप साखर
  3. 1 कप पाणी
  4. 1 पाव तूप
  5. 4-5 वेलदोड्याची पावडर
  6. 1 tbsp बेदाणे

सूचना

  1. बेसन एका वाडग्यात घालावे. २ टीस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन बेसनात घालावे. मिक्स करून ३-४ टेस्पून पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. 
  2. १५ मिनिटांनी परत एकदा मळून घ्यावे. खूप घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून मळावे. (पुरी लाटता येईल इतपतच मऊ करावे
  3. कढईत तूप गरम करावे. मळलेल्या बेसनाच्या पातळसर पुऱ्या लाटाव्यात. या पुऱ्या गरम तुपात तळून घ्याव्यात. आच मध्यम आणि मंद यांच्यामध्ये ठेवावी.
  4. पुऱ्या तळल्यावर खुसखुशीत झाल्या पाहिजेत. पुऱ्या कोमट झाल्या कि हाताने चुरून घ्याव्यात. पुऱ्या गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड केली.
  5. साखर आणि पाणी एकत्र करून दोन तारी पाक करावा. साखर विरघळून उकळी फुटली कि ३-४ मिनिटांनी पाकाचा एक थेंब प्लेटमध्ये टाकावा. दोन चिमटीत घेउन उघडझाप करावी .
  6. दोन तारा दिसल्या तर पाक तयार झाला असे समजावे नहितर अजून थोडावेळ उकळावे. फक्त मध्येमध्ये तार चेक करत राहावी. गरम दोनतारी पाक कुटलेल्या बेसनात घालावा. वेलचीपूड आणि बेदाणे घालावे. मिक्स करून मिश्रण आळू द्यावे.
  7. मिश्रण आळले कि लाडू वळावेत.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Minal Sardeshpande
Jan-19-2018
Minal Sardeshpande   Jan-19-2018

खूप छान!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर