मुख्यपृष्ठ / पाककृती / सात कप्प्याचे घावनं

Photo of Satth kapayche ghavan by Rohini Rathi at BetterButter
821
8
0.0(0)
0

सात कप्प्याचे घावनं

Jan-21-2018
Rohini Rathi
360 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सात कप्प्याचे घावनं कृती बद्दल

सात कप्प्याचे घावनं ही कोकणातील एक प्रसिद्ध पाककृती आहे ही पाककृती विशेष करून नवीन जावयाच्या न्याहारीसाठी कोकणात बनवली जाते ओले नारळ व गूळ यांचे मिश्रण करून घावण वर घालून 7 कप्पे बनवले जातात ही पाककृती बनवण्यास सोडी अवघड आहे परंतु खाण्यास खूप स्वादिष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ दोन कप
  2. ओला किसलेला नारळ अर्धा कप
  3. किसलेला गूळ अर्धा कप
  4. मीठ 1 टीस्पून
  5. तेल पॅनला लावण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजत घालावे
  2. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
  3. बॅटर मध्ये मीठ घालून मिक्सर मिक्स करून घ्यावे
  4. गूळ व ओले खोबरे यांचे मिश्रण बनून घ्यावे
  5. पॅन गरम करून त्यात घावन घालून घ्यावे व अर्ध्या बाजूस तयार नारळ व गुळाचे सारण घालून घ्यावे
  6. सारण असलेली बाजू अर्ध्या भागावर दुमडून घ्यावे
  7. नंतर अर्ध्या घावना च्या बाजूला नवीन घावन घालून घ्यावे
  8. तयार अर्ध्या घावना वर परत गूळ व खोबऱ्याचे सारण घालून घ्यावे
  9. अशाप्रकारे एकानंतर एक असे घावनाचे सात कप्पे बनवून
  10. अशा प्रकारे तयार घावनं ताटात काढून घ्यावे व त्याचे चाकूच्या साह्याने तुकडे करून घ्यावे
  11. अशाप्रकारे तयार आहे सात कप्प्याचे घावनं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर