उकडीचे मोदक | Ukadiche Modak Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  21st Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ukadiche Modak recipe in Marathi,उकडीचे मोदक, Archana Lokhande
उकडीचे मोदकby Archana Lokhande
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

0 votes
उकडीचे मोदक recipe

उकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ukadiche Modak Recipe in Marathi )

 • एक वाटी पाणी
 • एक चमचा तुप
 • चिमूटभर मीठ
 • एक वाटी तांदळाचे पीठ
 • एका ओल्या नारळाचा किस
 • एक वाटी किसलेले गुळ
 • दोन चमचे खसखस
 • एक चमचा वेलची पावडर
 • दोन ते तीन चमचे तुप
 • पाणी

उकडीचे मोदक | How to make Ukadiche Modak Recipe in Marathi

 1. यासाठी २ वाटी पाणी, एक चिमूट मीठ आणि १ चमचा साजुक तुप घालून पाणी उकळण्यास ठेवा.
 2. पाणी उकळले की, त्यात १ वाटी तांदळाचे पीठ घालून मिक्स करून एक वाफ आणा. थोडे वाफलले की गँस बंद करा. आणि मळून घ्या.
 3. आता सारणासाठी कढईत तुप गरम करून किस, गुळ , खसखस घालून शिजवून घ्या.
 4. मिश्रण घट्ट झाल्यावर विलायची पावडर घालून झाकण ठेऊन गँस बंद करा.
 5. आता तयार पिठ मोदक साच्यात ठेवून त्यात सारण भरून मोदक बनवून १०-१५ मिनीट वाफवून घ्या.
 6. थंड झाल्यावर वरून तुपाची धार सोडून बाप्पाला नेवैद दाखवा.

Reviews for Ukadiche Modak Recipe in Marathi (0)