457
3
0.0(1)
0

Vegetable Momos

Jan-21-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Vegetable Momos कृती बद्दल

eg momos recipe, a street food, chinese style steamed vegetable filling dumplings. Recipe of momos made in cooker easily.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • चायनीज
  • स्टीमिंग
  • अॅपिटायजर
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. कव्हरसाठी - दीड कप मैदा
  2. १/२ टिस्पून मिठ
  3. २ टिस्पून तेल
  4. सारण - १  टेस्पून तेल
  5. १/२ कप कोबी
  6. १/२ कप गाजर
  7. १ भोपळी मिरची,
  8. ६- ७ लसूण पाकळ्या
  9. १/२ इंच आल्याचा तुकडा
  10. १ हिरवी मिरची - एकदम बारीक चिरून घ्यावे.
  11. १/४ टिस्पून मिरपूड
  12. १ टिस्पून सोया सॉस
  13. चवीपुरते मिठ

सूचना

  1. कव्हर बनवून घ्यावे. त्यासाठी मैदा, मिठ, तेल एकत्र करून पाणी घालून पीठ मळून घ्यावे. झाकण ठेवून १५-२० मिनिटे ठेवावे
  2. सारण बनवण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण आले आणि मिरची परतून घ्यावी. सर्व भाज्या एकत्र घालाव्यात. मोठ्या आचेवर १-२ मिनिटे परताव्यात. त्यात मिठ, मिरपूड आणि सोया सॉस घालावा. तयार सारण एका वाडग्यात काढून घ्यावे. 
  3. भिजवलेल्या मैद्याचे १ इंचाचे छोटे गोळे करावे. त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. मध्यभागी १-२ चमचे सारण ठेवावे. एक कड हातात घेउन मध्यभागी आणावी. छोट्या-छोट्या चुण्या करून पहिल्या चुणीच्या मागे चिकटवाव्यात. अशाप्रकारे गोल पूर्ण करावा. तसेच करंजीच्या आकारातही मोमोज बनवता येतात. तयार झालेले मोमोज पिळून घेतलेल्या ओल्या कपड्याखाली ठेवावेत. सर्व मोमोज बनवून घ्यावेत.
  4. इडली पात्रात पाणी उकळवत ठेवावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यावर मोमोज ठेवून १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावे. ५ मिनिटांनी इडली पात्र उघडून मोमोज काढावेत. गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करावेत. 15 मोमोज तयार होतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Neeta, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर