Photo of Pav bhaji by Nandita Shyam at BetterButter
9192
843
4.4(0)
3

पाव भाजी

Feb-17-2016
Nandita Shyam
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव भाजी कृती बद्दल

पाव भाजी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे मिश्रण आहे जे कांदा व टोमॅटो सॉस मध्ये गरम करून त्यात वेगवेगळ्या मसाल्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून चविष्ट केले जाते. माझ्या मते ही एखाद्या स्नॅक किंवा फास्ट फूड पेक्षा खूप काही जास्त आहे. हे एक प्रकारचे जेवण आहे, जे झटपट बनविले जाते किंवा प्रवासात देखील बरोबर नेता येते. हे बटर मिश्रित गरम केलेले परिपूर्ण भोजन आहे आणि ज्याच्या ग्रेव्हीवर पुन्हा बटरचा थर असतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. भाजीसाठी :
  2. 3 टेबल स्पून - बटर
  3. 1 बारीक चिरलेला मोठा - कांदा
  4. 1 टी स्पून - आल्ले - लसूण पेस्ट
  5. 2 मोठे बटाटे - साली काढलेले आणि चौकोनी तुकडे केलेले
  6. 1 मोठे गाजर - साली काढलेले आणि चौकोनी तुकडे केलेले
  7. 10 फ्रेंच बीन्स - चिरलेल्या
  8. फ्लाॅवरची सुमारे 12-15 फुले
  9. हिरवे मटार - 1/2 कप
  10. 1 सिमला मिरची - बारीक चिरलेली
  11. 3 टोमॅटो, 1 बारीक चिरलेला आणि 2 ची प्युरी
  12. चवीनुसार - मीठ
  13. साखर - 1/2 टी स्पून
  14. 1/4 टी स्पून - हळद
  15. लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
  16. पाव भाजी मसाला - 1 टेबल स्पून
  17. काळे मीठ - 1/2 टी स्पून
  18. सजावटीसाठी कोथिंबीर
  19. पावासाठी :
  20. 8 - 10 लादी पाव
  21. पाव भाजण्यासाठी बटर
  22. पाव भाजी मसाला ( ऐच्छिक )
  23. खायला देण्यासाठी :
  24. 1 मोठा कांदा - बारीक चिरलेला
  25. सजावटीसाठी कोथिंबीर - 1 टेबल स्पून
  26. 2 - लिंबूचे केलेले तुकडे

सूचना

  1. भाजी बनविण्यासाठी :
  2. जाड तळाच्या पॅनमध्ये बटर गरम करावे आणि त्यामध्ये चिरलेला कांदा घालावा. तो अर्धपारदर्शक झाल्यावर त्यात आल्ले - लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत तळावे.
  3. आता बटाटे, गाजर, बीन्स आणि मटार घालून ते शिजेपर्यंत तळावे.
  4. त्यामध्ये फ्लॉवरची फुले, चिरलेली सिमला मिरची, मीठ, साखर, हळद व लाल मिरची पावडर घालून हलवत रहावे आणि 3-4 मिनिटे परतावे.
  5. चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोची प्युरी टाकून व्यवस्थित मिसळून घ्यावे , अडीच कप पाणी टाकून भाज्या पूर्ण शिजेपर्यंत झाकून ठेवावे.
  6. बटाटे मॅशरने मिश्रणाचा लगदा करावा. पाव भाजी मसाला व काळे मीठ घालून आणखी थोडा वेळ लगदा करावा.
  7. भाजी आणखी 5 मिनिटे मंद आचेवर शिजवावी. भाजी जास्त घट्ट वाटल्यास त्यात अर्धा कप पाणी टाकावे, भाजी अजून 2 मिनिटे शिजवावी .
  8. तयार भाजी कोथिंबीरीने सजवावी आणि कुरकुरीत भाजलेल्या पावासोबत गरमागरम खायला द्यावी .
  9. पावासाठी :
  10. पाव समांतर कापून पावाच्या आतील बाजूस भरपूर बटर लावावे.
  11. अगोदर गरम केलेल्या तव्यावर बटर लावलेली पावाची बाजू ठेवावी आणि तो तांबूस व कुरकुरीत होईपर्यंत भाजावे.
  12. आता पाव बंद करून दुसर्‍या बाजूने चांगला भाजावा. गरज वाटल्यास आणखी बटर लावावे.
  13. खायला देण्यासाठी :
  14. 1 कप भाजी घ्यावी , दोन कुरकुरीत पाव ठेवावेत , चिरलेला कांदा आणि लिंबूचे तुकडे प्लेटमध्ये ठेवावेत.
  15. भाजीच्या वरील बाजूस जास्तीचे बटर घालावे आणि गरज वाटली तर पाव भाजी मसाल्यासोबत कोथिंबीरीने सजवून गरमागरम खायला द्यावी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर