मुख्यपृष्ठ / पाककृती / गोळ्याची आमटी

Photo of Lentils in sweet n sour sauce by Susmita Tadwalkar at BetterButter
670
6
0.0(0)
0

गोळ्याची आमटी

Feb-02-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोळ्याची आमटी कृती बद्दल

सोपी, सुटसुटीत आणि चटपटीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी हरभरा डाळ
  2. १/२ वाटी ऊडिद डाळ
  3. पाव वाटी मुग डाळ
  4. २-३ हिरव्या मिरच्या
  5. पाव वाटी चिंचेचा घट्ट कोळ
  6. १ चमचा गोडा मसाला
  7. १/२ चमचा सांबार मसाला
  8. चवीनुसार तिखट, मिठ, गुळ
  9. १ मोठा चमचा तेल
  10. मोहरी, हिंग, हळद

सूचना

  1. प्रथम तिन्ही डाळी धुऊन २ तास भिजत घाला
  2. सर्व पाणि‌ काढून हिरव्या मिरच्या घालून वाटून घ्या
  3. ह्यामध्ये थोडा हिंग व मिठ घालून निट मिसळून घ्या
  4. मिश्रण जरा घट्टसर ठेवा
  5. ह्या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून कूकरमध्ये ठेवून वाफवून‌ घ्या
  6. आमटीसाठी चिंचेचा कोळ ३ कप पाणि घालून ऊकळायला ठेवा
  7. ह्यात गोडा‌ मसाला, सांबार मसाला, तिखट, मिठ, गुळ, घाला
  8. आता त्यात वाफवलेले गोळे सोडा
  9. थोडा वेळ शिजू द्या
  10. आता कढण्यामध्ये तेल गरम करून मोहरी व हिंग घालून फोडणी करून आमटीवर घाला
  11. कोथिम्बीर, खोबरे घालून गरम भाताबरोबर वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर