डाळ फळ | Dal Fal Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  3rd Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dal Fal by Vaishali Joshi at BetterButter
डाळ फळby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

0 votes
डाळ फळ recipe

डाळ फळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Fal Recipe in Marathi )

 • कोथिमबिर
 • लिंबू रस
 • हिंग
 • मोहोरी
 • तेल
 • ६-७ लसुण पाकळ्य़ा
 • १ दोडका ( घोसाळ )
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • २ टोमेटो
 • फोडणी साठी --१ कांदा
 • कोथिमबिर
 • तेल
 • धणे पावडर
 • लींबाचा रस
 • ओवा
 • मीठ
 • हळद
 • तिखट
 • १/२ कप बेसन +तांदुळ पीठ (ही पीठे आवडी प्रमाणे बदलू शकता )
 • १कप ज्वारी पीठ
 • फळ बनविण्या साठी --३कप कणिक
 • १/२ कप मिक्स डाळि आवडी प्रमाणे (मूग,चणा,मसूर )
 • डाळी साठी साहित्य (वरण )--१ कप तुरीची डाळ

डाळ फळ | How to make Dal Fal Recipe in Marathi

 1. सगळ्या डाळी धूवून एका गंजात घेउन पाणी टाकून कुकर मध्ये वरण शिजवून घ्या
 2. परातीत सगळी पीठ एकत्र करा
 3. त्यात सगळे साहित्य टाका(तिखट ,हळद,मीठ,धणे पावडर, ओवा , लिंबू रस ,कोथिमबिर , तेल )
 4. लागेल तस पाणी टाकून पीठ मळून घ्या
 5. थोड्या वेळ साठी तसेच राहू द्या
 6. तेलाचा हात लाऊन पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याला चपटा आकार देऊन सगळे फळ करून घ्या
 7. आता गैस वर कढई तापत ठेउन तेल टाका
 8. मोहोरी तडतडू द्या
 9. अनुक्रमे कांदा ,ठेचलेला लसूण ,मिरच्या,दोडक्या च्या फोडी ,हिंग टाकून परता
 10. टोमेटो टाका
 11. हळद ,तिखट ,धणे पावडर टाकून परता
 12. वरण घोटून त्यात घाला
 13. चवीपुरते मीठ आणि लिंबू रस टाका
 14. वरणा ला उकळी आली की त्याचात एक एक करून सगळे फळ टाकून १५ मिनिटे शिजू दया
 15. सर्व्ह करताना फोडणिचे तेल + कोथिमबिर वरुन घाला

Reviews for Dal Fal Recipe in Marathi (0)