मुख्यपृष्ठ / पाककृती / मालवणी कोलंबी रस्सा

Photo of Malwani Prawns Curry by Purva Sawant at BetterButter
1512
4
0.0(0)
0

मालवणी कोलंबी रस्सा

Feb-04-2018
Purva Sawant
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मालवणी कोलंबी रस्सा कृती बद्दल

अतिशय रुचकर …………बस एवढंच वर्णन पुरेसं आहे. बाकीच आपल्या जीभेवर सोपवा.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. सोललेली कोळंबी, मध्यम आकाराची- १/२ कप
  2. बटाटा- १ मध्यम  (ऐच्छिक)
  3. कांदा, बारीक चिरून- १/२ कप (१ मध्यम.)
  4. भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण - ३ ते ४ टेबलस्पून
  5. आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
  6. हळद - १/२ टिस्पून
  7. हिंग-१/४  टिस्पून
  8. दालचिनी- १ इंच
  9. तमालपत्र- २
  10. मालवणी मसाला- ३ ते ४ टिस्पून
  11. गरम मसाला- १ टिस्पून
  12. कोकम/ आमसुलं- ४ ते ५
  13. तेल- ३ टेबलस्पून
  14. कोथिंबीर, बारीक चिरलेली- २ टेबलस्पून
  15. मीठ- चवीनुसार

सूचना

  1. कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा. व्यवस्थित धुवून घ्यावी. तिला थोडेसे मीठ व हळद चोळून अर्धा तास मुरत ठेवावी.
  2. बटाटे सोलून साधारण १ इंचाचे तुकडे करावेत.  (आमच्या कोकणात वांगी, कच्चा पपई, आलकोल/नवलकोल, दुधी भोपळा इ. भाज्या सुद्धा या रश्यात घातल्या जातात. तुम्हाला आवडत नसेल तर बटाटा नाही घातला तरी चालेल. )
  3. मोठ्या पॅनमधे किंवा कढईत तेल गरम करावे. त्यात कांदा, दालचिनी घालून तपकिरी रंगावर परतावे
  4. हिंग, हळद व मसाला, आले-लसुण पेस्ट आणि खोबऱ्याचे वाटण घालावे. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतावा.
  5. त्यात कोळंबी घालून एक मिनिट परतून घ्यावी
  6. पाणी, बटाटा घालून चांगले मिक्स करावे व झाकण ठेऊन मंद आचेवर ५-६ मिनीटे शिजवावे.
  7. कोकम, गरम मसाला, कोथिंबीर टाकून हलकेच ढवळा आणि झाकून ठेवा.  गॅस बंद करा. (कोकम ऐवजी २ टिस्पून चिंचेचा कोळ वापरू शकता.)
  8. भाकरी किंवा गरम भाताबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर