रेस्टॉरंट स्टाईल पेपर डोसा | Restaurant Style Paper Dosa Recipe in Marathi

प्रेषक Anupa Joseph  |  22nd Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Restaurant Style Paper Dosa by Anupa Joseph at BetterButter
रेस्टॉरंट स्टाईल पेपर डोसा by Anupa Joseph
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

4878

0

Video for key ingredients

 • Sambhar Powder

About Restaurant Style Paper Dosa Recipe in Marathi

रेस्टॉरंट स्टाईल पेपर डोसा recipe

रेस्टॉरंट स्टाईल पेपर डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Restaurant Style Paper Dosa Recipe in Marathi )

 • 2 वाट्या तांदूळ
 • 1 वाटी उकडा तांदूळ
 • 1 वाटी उडीदडाळ
 • 2 मोठे चमचे चणाडाळ
 • अर्धा लहान चमचा मेथी
 • तेल
 • पाणी
 • मीठ चवीनुसार

रेस्टॉरंट स्टाईल पेपर डोसा | How to make Restaurant Style Paper Dosa Recipe in Marathi

 1. 1-5 पर्यंतच्या साहित्याला वेगवेगळे धुवा आणि रात्रभर भिजवून ठेवा. यातील अतिरिक्त पाणि काढून टाका. उडीदडाळ, मेथी आणि चणाडाळीला आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटा आणि मिश्रण तयार करा. या मिश्रणाला एका वाडग्यात काढा.
 2. तांदूळ आणि उकडा तांदळाला बरोबर आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटा. याला सुद्धा एका वाडग्यात काढून घ्या. नंतर मीठ घालून या मिश्रणाला पहिल्या मिश्रणात एकत्र करा.
 3. याला उबदार जागी आंबण्यासाठी ठेवा. मिश्रण आंबल्यानंतर त्याला हळुवारपणे हलवा.
 4. नॉनस्टीक डोसा तव्याला गरम करा. त्यावर थोडे तेल शिंपडून पेपर टॉवेलने पुसून घ्या. नंतर डावने मिश्रण तव्याच्या मध्यभागी घाला. या मिश्रणाला बाहेरच्या बाजूला गोलाकार पसरवा आणि चपटे करत जा.
 5. जेव्हा डोसा शिजताना आणि बदामी रंगाचा होताना दिसेल, तेव्हा त्यावर थोड्या तेलाचा शिडकाव करा आणि वाढण्याच्या ताटात काढून घ्या.
 6. सांबार आणि नारळाच्या चटणीबरोबर गरम गरम वाढा.

My Tip:

चणाडाळ डोश्याला खुसखुशीतपणा आणते आणि त्यामुळे याला वापरणे तुम्ही टाळू नये. उपलब्ध नसल्यास, तुम्ही उकडा तांदूळ टाळू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये चांगले आंबवण्यासाठी तुम्ही लाईट्स चालू केलेल्या/किंचित प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये नंतर लाईट्स बंद करून मिश्रण आत घालून बाऊल ठेवू शकता.

Reviews for Restaurant Style Paper Dosa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo