मुख्यपृष्ठ / पाककृती / रेस्टॉरंट स्टाईल पेपर डोसा

Photo of Restaurant Style Paper Dosa by Anupa Joseph at BetterButter
5542
615
4.5(0)
0

रेस्टॉरंट स्टाईल पेपर डोसा

Feb-22-2016
Anupa Joseph
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  •  केरळ

साहित्य सर्विंग: 8

  1. 2 वाट्या तांदूळ
  2. 1 वाटी उकडा तांदूळ
  3. 1 वाटी उडीदडाळ
  4. 2 मोठे चमचे चणाडाळ
  5. अर्धा लहान चमचा मेथी
  6. तेल
  7. पाणी
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. 1-5 पर्यंतच्या साहित्याला वेगवेगळे धुवा आणि रात्रभर भिजवून ठेवा. यातील अतिरिक्त पाणि काढून टाका. उडीदडाळ, मेथी आणि चणाडाळीला आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटा आणि मिश्रण तयार करा. या मिश्रणाला एका वाडग्यात काढा.
  2. तांदूळ आणि उकडा तांदळाला बरोबर आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटा. याला सुद्धा एका वाडग्यात काढून घ्या. नंतर मीठ घालून या मिश्रणाला पहिल्या मिश्रणात एकत्र करा.
  3. याला उबदार जागी आंबण्यासाठी ठेवा. मिश्रण आंबल्यानंतर त्याला हळुवारपणे हलवा.
  4. नॉनस्टीक डोसा तव्याला गरम करा. त्यावर थोडे तेल शिंपडून पेपर टॉवेलने पुसून घ्या. नंतर डावने मिश्रण तव्याच्या मध्यभागी घाला. या मिश्रणाला बाहेरच्या बाजूला गोलाकार पसरवा आणि चपटे करत जा.
  5. जेव्हा डोसा शिजताना आणि बदामी रंगाचा होताना दिसेल, तेव्हा त्यावर थोड्या तेलाचा शिडकाव करा आणि वाढण्याच्या ताटात काढून घ्या.
  6. सांबार आणि नारळाच्या चटणीबरोबर गरम गरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर