आलू टिक्की चाट | Aloo Tikki Chaat Recipe in Marathi

प्रेषक Pavani Nandula  |  24th Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Aloo Tikki Chaat by Pavani Nandula at BetterButter
आलू टिक्की चाटby Pavani Nandula
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4476

0

आलू टिक्की चाट recipe

आलू टिक्की चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aloo Tikki Chaat Recipe in Marathi )

 • बटाटे - 2 मध्यम आकाराचे उकडलेले, सोललेले आणि कुस्करलेले
 • हिरवे वाटाणे - 1/2 वाटी
 • काळे जिरे - 1/2 लहान चमचा
 • जिरे - 1 लहान चमचा
 • हिरव्या मिरच्या - 2-3, बारीक चिरलेल्या
 • कोथिंबीर - 2 मोठे चमचे बारीक चिरलेली
 • मक्याचे पीठ - 1 मोठा चमचा
 • शिजवलेले छोले - 2 वाट्या
 • 1 लहान कांदा बारीक चिरलेला
 • 1-2 हिरव्या मिरच्या, मधून चिरलेल्या
 • धणेपूड - 1 लहान चमचा
 • जिरेपूड - 1 लहान चमचा
 • लाल तिखट - 1 लहान चमचा (स्वादानुसार घालू शकता)
 • आमचूर पावडर - 1 लहान चमचा
 • गरम मसाला - 1/2 लहान चमचा
 • टोमॅटो प्युरी - 2 मोठे चमचे (किंवा 1 कच्चा टोमॅटो)
 • मिरपूड आणि मीठ - स्वादानुसार
 • शेव - वाढण्यासाठी
 • खजूर चिंचेची चटणी - वाढण्यासाठी
 • हिरवी चटणी - वाढण्यासाठी
 • फेटलेले दही - वाढण्यासाठी
 • लाल कांदा - सजविण्यासाठी

आलू टिक्की चाट | How to make Aloo Tikki Chaat Recipe in Marathi

 1. छोले बनाविण्यासाठी एका कढईत 2 लहान चमचे तेल गरम करा. त्यात कांदा घालून 2-3 मिनिटे किंवा पारदर्शक होईपर्यंत परता. त्यात धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट, आमचूर पावडर, गरम मसाला आणि 1 कप पाणी घाला. चांगले मिसळा आणि 1-2 मिनिटे शिजवा.
 2. आता टोमॅटोची प्युरी घालून 2-3 मिनिटे शिजवा, अधूनमधून हलवित रहा.
 3. नंतर शिजवलेले छोले, मीठ आणि मिरपूड घालून हलवा आणि 4-5 मिनिटे शिजवा. छोले मॅशरने हलके कुस्करा. वाढण्यासाठी तयार होईपर्यंत बाजूला ठेवा.
 4. आलू पॅटीस बनविण्यासाठी : एका कढईत 2 लहान चमचे तेल गरम करा, त्यात काळे जिरे आणि जिरे घाला. तडतडायला लागले की त्यात हिरव्या मिरच्या घाला आणि थोड्या मिनिटांसाठी परता.
 5. एका मोठ्या वाडग्यात कुस्करलेले बटाटे, हिरवे वाटाणे, कोथिंबीर, मक्याचे पीठ, मीठ आणि फोडणी मिळवा. एकजीव केल्यावर 8 सारखे भाग करा. नंतर प्रत्येक भागाला गोळा असा चपटा आकार देऊन टिक्की बनवा.
 6. एका नॉनस्टीक तव्यावर तेल गरम करा आणि त्यात या टिक्क्या दोन्ही बाजूने तपकिरी होईपर्यंत परता, प्रत्येक बाजू सुमारे 2-3 मिनिटे परतून घ्या.
 7. वाढण्यासाठी : वाडग्यात 2 टिक्की ठेवा त्यावर थोडे छोले, शेव, हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घाला. आणि ताबडतोब वाढा.

Reviews for Aloo Tikki Chaat Recipe in Marathi (0)