दही वडा | Dahi wada Recipe in Marathi

प्रेषक Ajinkya Shende  |  23rd Feb 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Dahi wada by Ajinkya Shende at BetterButter
दही वडाby Ajinkya Shende
 • तयारी साठी वेळ

  6

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

1

1 vote
दही वडा recipe

दही वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi wada Recipe in Marathi )

 • सफेद उडिद डाळ दिड वाटी(४ तास भीजवलेली)
 • आलं व हिरवी मिर्ची
 • दही अर्धा किलो
 • फोडणीसाठी तेल,जीरं,कधीपत्ता,सुक्या लाल मिरच्या २
 • साखर आवडीनुसार(अर्धी वाटी)
 • मीठ चवीनुसार
 • काळ मीठ पाव चमचा
 • भाजलेल्या जीऱ्याची पावडर
 • लाल मिर्ची पावडर
 • चाट मसाला
 • कोथिम्बीर

दही वडा | How to make Dahi wada Recipe in Marathi

 1. प्रथम भीजवलेली उडिद डाळ आलं व हिरवी मिर्ची टाकून मिक्सर मधे वाटून घ्यावी.
 2. नंतर मीठ टाकून हे मिश्रण ५-७ मिनिट एकाचं बाजूने फेटुन घ्यावे.
 3. नंतर एका बाऊल मधे गरम पाण्यात चीमुठभर हींग व थोडं मीठ टाकून बाजुला ठेवावे.
 4. नंतर ह्याचे हवे त्या आकाराचे गोल वडे तळून घ्यावे.(वडे बनवताना हातला थोडं पाणी लावावं त्यामुळे हे उडिद डाळीचं मिश्रण हाताला चिटकत नाही)
 5. नंतर हे वडे ३-४ मिनिट हींगाच्या पाण्यात भीजवुन नंतर वडयातील पाणी वडे हाताने दाबून काढून टाकावे.
 6. नंतर एका बाऊल मधे दही घेवून त्यात साखर,थोडं मीठ,थोडा चाट मसाला,थोडं काळ मीठ व थोडं पाणी टाकून दही फेटुन स्मूथ करुन घ्यावे.
 7. नंतर एका पॅन मधे २ चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात जीरं,सुकी लाल मिर्ची व कधीपत्ता टाकून फिडणी करुन ही फोडणी दहयात टाकून दही व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
 8. नंतर एका सर्विंग बाऊल मधे २ वडे ठेवून त्यावर दही,जीरा पावडर,लाल मिर्ची पावडर,थोडा चाट मसाला टाकावा व थोडी कोथिम्बीर टाकून गार्निश करुन घ्यावे.आवडत असल्यास चिंचेची चटणी पण टाकु शकता.

My Tip:

वडे हींगाच्या पाण्यात भीजवुन नंतर अर्धा तास दहयात भीजवुन फ्रिज मधे ठेवले तर चव जास्त चांगली लागते.

Reviews for Dahi wada Recipe in Marathi (1)

kalpesh thakur4 months ago

Ajinky nice and simple recipe plz share chicken biryani recipe
Reply