Photo of Besan vadi by pranali deshmukh at BetterButter
7105
6
0.0(0)
0

बेसन वडी

Feb-24-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन वडी कृती बद्दल

कुठे बाहेरगावी जत्रेला ,सहलीला जायचं म्हटलं तर बेसन वडी आठवते कारण प्रवासात इतर भाज्या आपण बॅगमध्ये ठेवताना ठेवतांना खूप त्रास होतो पण हि भाजी अगदी कोरडी आहे न तेल बाहेर येत ना कशाला डाग लागत .शिवाय दोन दिवस आरामात टिकते कारण बेसनामध्ये दही मिक्स करून हि वडी बनवली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी बेसन चणा पिठ
  2. 1 वाटी आंबट दही
  3. दोन हिरव्या मिरच्या
  4. दोन कांदे
  5. हिंग
  6. मोहरी 1/2 tbsp
  7. तिखट 2 tbsp
  8. हळद 1 tbsp
  9. मीठ
  10. तेल 2 डाव
  11. कोथिंबीर बारीक चिरलेली 1/4 कप

सूचना

  1. प्रथम बेसन आणि दही एकत्र करून घ्या .छान मिक्स करा .
  2. त्यामध्ये तिखट ,हळद मीठ टाका.थोडं पाणी घाला पातळ व्हायला नको .
  3. कढईत तेल टाका मोहरी ,हिंग ,कांदा गुलाबी होईपर्यंत परतवा . मिरच्या टाका थोडं अरत परत करा आणि मिक्स केलेलं दही बेसन फोडणीत टाका.मिक्स करा कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवून 10 - 15 मिनिट शिजू द्या .
  4. एका प्लेटला तेलाने ग्रीसिंग करा .शिजलेला बेसनाचा गोळा प्लेटमध्ये अंथरा.एका सपाट प्लेटने समांतर करा .
  5. धारदार सुरीने वड्या पाडा.
  6. भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा .एकदा ट्राय करून बघा .दोनघास नक्की जास्त जातील.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर