मुख्यपृष्ठ / पाककृती / कटाची आमटी/सार

Photo of Katachi amati/sar by Ajinkya Shende at BetterButter
702
5
0.0(0)
0

कटाची आमटी/सार

Feb-25-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कटाची आमटी/सार कृती बद्दल

पूरणपोळी सोबत ही कटाची आमटी/सार खुप अप्रतिम लागते..

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
  2. अल्याचा छोटा तुकडा
  3. ७-८ पाकळ्या लसुण
  4. कोथिम्बीर
  5. पूरणाची डाळ शिजवल्यानंतर डाळीचं उरलेलं पाणी
  6. पूरण अर्धी वाटी
  7. तेल अर्धी वाटी
  8. शेंगदाणे
  9. जीरं,हींग,मोहिरी,कढीपत्ता
  10. लाल मिर्ची पावडर अर्धा चमचा
  11. काळा मसाला एक चमाचा
  12. हळद पाव चमाचा
  13. धणा जीरा पावडर अर्धा चमचा
  14. मीठ

सूचना

  1. प्रथम खोबरं,आलं,लसुण व कोथिम्बीर हयांचं मिक्सर मधे वाटण करुन घ्यावे.
  2. नंतर एका कढई मधे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात जीरं,मोहोरी,कढीपत्ता,शेंगदाणे व हींग टाकून त्यात खोबऱ्याचं वाटण टाकून थोडं परतवुन घ्यावं.
  3. नंतर हयात लाल मिर्ची पावडर,काळा मसाला,हळद,धणा जीरा पावडर टाकून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवुन घ्यावे.
  4. नंतर त्यात पूरण,डाळीचं पाणी, आवश्यकतेनुसार साधं पाणी,चवीनुसार मीठ व कोथिम्बीर टाकून तवंग येईपर्यंत सार ऊकळवुन घ्यावा.
  5. ही आमटी/सार गरम पूरणपोळी व वाफाळलेल्या भातासोबत सर्व करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर