मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट थालीपीठ

Photo of Thalipith by Sneha Adhav at BetterButter
432
5
0.0(0)
0

झटपट थालीपीठ

Feb-28-2018
Sneha Adhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट थालीपीठ कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या ज्वारीचे पीठ
  2. पाव वाटी बेसन
  3. पाव वाटी गव्हाचे पीठ
  4. पाव वाटी भिजवलेले पोहे
  5. हळद
  6. तीळ
  7. लसूण
  8. हिरव्या मिरच्या
  9. धणे
  10. जिरे
  11. मीठ
  12. बारीक चिरलेला कांदा
  13. कोथिंबीर

सूचना

  1. सर्वात आधी एका मोठ्या बाऊल मध्ये 2 वाट्या ज्वारीचे पीठ, पाव वाटी बेसन, पाव वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी भिजवलेले पोहे घेवून हे सर्व छान मिक्स करा. 
  2. यात 1 चमचा हळद, 2 चमचे तीळ घाला. आता मिक्सर मध्ये लसूण, हिरवी मिरची, धणे, जिरे, ओवा व मीठ घालून बारीक वाटून घ्यावे.
  3. हे वाटण वरील पिठात घाला. आता यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, घालून मिक्स करा. 
  4. जर तुमच्या कडे घरी कोणतीही पालेभाजी असेल तर ती पण यात घालू शकता तसेच किसलेला दुधी, उरलेला भात, भाजी पण घालू शकता. आता लागेल तसे पाणी घालून हे छान मळून घ्यावे.
  5. ज्यास्त पातळ किवा घट्ट मळू नये. प्लॅस्टिक पेपर किवा ओल्या कापडावर थापून छान खरपूस भाजून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर