मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिस्पी कॉर्न कर्नल्स

Photo of Crispy Corn Kernels by Anjana Chaturvedi at BetterButter
13451
315
4.7(0)
0

क्रिस्पी कॉर्न कर्नल्स

Jul-29-2015
Anjana Chaturvedi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • नॉर्थ इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी मक्याचे दाणे
  2. अडीच मोठे चमचे तांदळाचे पीठ
  3. 2 मोठे चमचे कॉर्न फ्लोर
  4. 1/3 लहान चमचा मिरपूड
  5. परतण्यासाठी -
  6. अडीच मोठे चमचे बारीक चिरलेली भोपळी मिरची
  7. अडीच मोठे चमचे चिरलेली ताजी कोथिंबीर
  8. 1 लहान चमचा चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  9. 1 लहान चमचा सोया सॉस
  10. दीड लहान चमचा विनेगर
  11. एक चिमूटभर मिरपूड

सूचना

  1. डब्यातील मक्याच्या दाण्याचे पाणी गाळून घ्या. एक वडगा घ्या आणि त्यात मक्याचे दाणे आणि मीठ, मिरपूड घाला आणि चांगले मिसळा.
  2. त्यावर तांदळाचे पीठ आणि कॉर्न फ्लोर पसरवा आणि मिसळा (पाणी घालायची आवश्यकता नाही). 1 मिनिटासाठी ठेवा.
  3. एका मोठ्या कढईत तळण्यासाठी पुरेसे तेल घ्या. गरम तेलात मुठभर मक्याचे दाणे घाला.
  4. हळू हळू हलवा आणि तळा, ते तडतडायला लागले की त्यावर थोड्या वेळ झाकण लावा. मक्याचे दाणे कुरकुरीत व्हायला लागले की ते कढईत तेलावर तरंगतील.
  5. एकदा ते झाले की कढईतून काढून घ्या. त्यातील अतिरिक्त तेल काढण्यासाठी एका पेपर नॅपकीनवर काढा.
  6. एका भांड्यात एक लहान चमचा तेल गरम करा. त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि भोपळा मिरची थोड्या वेळासाठी परता. त्यात ताजी चिरलेली कोथिंबीर, सोया सॉस,व्हीनेगर, एक चिमूटभर मिरपूड घाला आणि मिसळा.
  7. आता त्यात तळलेले मक्याचे दाणे घालून चांगले मिसळा. ताबडतोब वाढा आणि आनंद घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर