पालक चाट | palak chaat Recipe in Marathi

प्रेषक साची सचिन  |  4th Mar 2018  |  
4.8 from 4 reviews Rate It!
 • Photo of palak chaat by साची सचिन at BetterButter
पालक चाटby साची सचिन
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

4

पालक चाट recipe

पालक चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make palak chaat Recipe in Marathi )

 • १ जुडी पालक
 • १ वाटी बेसन
 • १ चमचा जीर
 • १ चमचा तिखट
 • १/२ चमचा हळद
 • पाव चमचा खायचा सोडा
 • १ वाटी उकडलेले मुग (मिठ हळद घालुन)
 • चिंच गुळ चटणी (१वाटी चिंचेचा कोल,गुळ,तिखट,मिठ,जीरा पाउडर एकत्र करुन गॅस वर १५ मिनट शिजवा)
 • पुदीना चटणी (कोथिंबीर पुदीना आल हिरवी मिरची लिम्बाचा रस मिठ)
 • चाट मसाला
 • बारीक़ शेव
 • दही १ वाटी
 • १ चमचा साखर
 • मिठ
 • तेल

पालक चाट | How to make palak chaat Recipe in Marathi

 1. पालक चांगला धुवून पाण्याचे देठ थोड़े तोडून घ्यावे
 2. मग एका बाउल मधे बेसन जीर तिखट हळद सोडा घालुन भजी साठी पीठ भिजवून घ्यावे
 3. मग एक एक पान पीठात भिजवून भजी करुन घ्यावी
 4. आता एका डिश मधे भजीचे तुकडे घालावे.आणि त्यात उकडलेले मूंग घालावे
 5. आता त्यात दही, चिंचेचि चटणी,पुदीना चटणी घालावि
 6. थोडा चाट मसाला भुरभुरा
 7. शेव घालुन सर्व्ह करा पालक चाट

My Tip:

पालक एवजी मेथीची भजी देखील चालेल.

Reviews for palak chaat Recipe in Marathi (4)

Swati Kulkarni2 years ago

मस्तच
Reply
साची सचिन
2 years ago
धन्यवाद

लेखा औसरकर2 years ago

छान मस्त रेसीपी
Reply
साची सचिन
2 years ago
धन्यवाद

Sailee Pradhan2 years ago

Sunder chat receipe
Reply

Ajita Moraskar2 years ago

खूप टेम्पटिंग
Reply