BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक मेथी धिरडे

Photo of Fenugreek Seeds Dosa by Sanika SN at BetterButter
306
7
0(0)
0

पौष्टिक मेथी धिरडे

Mar-06-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक मेथी धिरडे कृती बद्दल

मेथी व इतर डाळींचा समावेष या पाककृतीत असल्यामुळे अत्यंत पाैष्टिक आहे. मधुमेहांसाठीही उपयुक्त.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. ६ वाट्या तांदूळ
 2. २ वाट्या तूरडाळ
 3. २ वाट्या चणाडाळ
 4. २ वाट्या उडीदडाळ
 5. २ वाट्या ज्वारी
 6. १ वाटी गहू
 7. १ वाटी धणे
 8. १/२ वाटी मेथीदाणे
 9. वरील सर्व जिन्नस न भाजता एकत्र दळून आणा.
 10. २ वाट्या तयार धिरडे पीठ
 11. १०-१५ लसूण ठेचून (भरपुर लसूण घालावा, मेथी+लसूण भन्नाट चव लागते)
 12. १/२ टीस्पून हळद
 13. १-१/२ टीस्पून लाल तिखट
 14. मीठ चवीनुसार
 15. २ चमचे तेल

सूचना

 1. पिठात हळद, लाल तिखट, ठेचलेले लसूण, मीठ व दोन चमचे तेल घालावे.
 2. एक वाटी पीठ असल्यास २ वाट्या पाणी असे प्रमाण आहे, त्याप्रमाणे पाणी घालून , नीट मिक्स करावे.
 3. नॉन-स्टीक तवा गरम करुन घ्यावा व मंद आच करून थोडे तेल ब्रश करुन, वाटीने पीठ ओतावे.
 4. थोडे तेल सोडून एका बाजूने छान होऊ द्यावे मग उलटवून दुसरी बाजू शिजु द्यावी.
 5. गरम-गरम धिरडे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर