मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीचा उपमा

Photo of Naachani Upma by Saraswati Vasmatkar at BetterButter
875
6
0.0(0)
0

नाचणीचा उपमा

Mar-07-2018
Saraswati Vasmatkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीचा उपमा कृती बद्दल

पौष्टीक आणि चविष्ट नाश्ता, घरातील प्रत्येकासाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. नाचणी पीठ १ कप
  2. मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा १
  3. मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो १
  4. किसलेलं अद्रक १ टीस्पून
  5. बारीक चिरलेली हिरवी मिरची २-३
  6. कढीपत्ता ७-८ पानं
  7. चौकोनी तुकडे केलेला मध्यम गाजर १
  8. मटार दाणे पाव कप
  9. स्वीट काॅर्न दाणे पाव कप
  10. फोडणीसाठी तेल २-३ टेस्पून
  11. जिरे पाव टीस्पून
  12. मोहरी पाव टीस्पून
  13. पाव टीस्पून हळद
  14. मीठ चवीनुसार
  15. ओवा अर्धा टीस्पून
  16. गरम पाणी
  17. कोथिंबीर सर्व्हिंगसाठी
  18. किसलेलं नारळ सर्व्हिंगसाठी

सूचना

  1. १. प्रथम एका कढईत नाचणीचं पीठ आणि ओवा एकत्र कोरडेच भाजून घ्यावे.
  2. २. नाचणीचा कच्चा वास गेला आणि भाजलेला खमंग वास आला की ते पीठ एका ताटात काढावे.
  3. ३. दुसरीकडे एक ग्लास पाणी गरम करायला ठेवावे.
  4. ४. नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी घालावे.
  5. ५. मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक घालून एक वाफ काढावी.
  6. ६. कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाले की त्यात गाजराचे तुकडे, मटार दाणे, स्वीट काॅर्नचे दाणे आणि हळद घालून परतावे.
  7. ७. हे सर्व साहित्य २-३ मिनिटे झाकून एक वाफ काढावी.
  8. ८. नंतर त्यात नाचणीचे पीठ (ओव्यासकट) आणि मीठ घालून परतून घ्यावे.
  9. ९. त्यानंतर त्यात गरम पाणी घालून छान ढवळून वाफेवर २ -३ मिनिटे ठेवावे.
  10. १०.गरमागरम उपमा कोथिंबीर आणि किसलेलं नारळ घालून सर्व्ह करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर