मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट आणि आरोग्यपूर्ण आईसक्रीम

Photo of Healthy Icecream by Purva Sawant at BetterButter
439
8
0.0(0)
0

झटपट आणि आरोग्यपूर्ण आईसक्रीम

Mar-07-2018
Purva Sawant
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट आणि आरोग्यपूर्ण आईसक्रीम कृती बद्दल

कधी कधी मुलं आईसक्रीमसाठी फारच हट्ट करतात. पण दरवेळी त्यांचा हट्ट पूर्ण करण आरोग्याच्या दृष्टीने परवडण्यासारख नसत. अश्यावेळी  घराच्या घरी, झटपट आणि आरोग्यपूर्ण असं हे आईसक्रीम बनवून त्यांचा हट्ट पूर्ण करता येईल. म्हणजेच  बच्चे भी खुश और मम्मी भी खुश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • अमेरीकन
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. केळी- २
  2. खजूर- १०
  3. खजूर, छोटे तुकडे करून- १ टेबलस्पून
  4. बदाम, चकत्या करून-  १ टेबलस्पून
  5. कॅंडिड चेरी-३

सूचना

  1. खजूर २-३ तास पाण्यात भिजत घाला म्हणजे ते मऊ होतील. आतील बिया काढून टाका.
  2. मिक्सरच्या भांड्यात केळी कापून टाका. त्यात भिजवलेले खजूर पण टाका.
  3. मिक्सरवर छान मऊसुत वाटून घ्या.
  4. त्यात खजुराचे आणि बदामाचे अर्धे तुकडे घाला.
  5. मिश्रण व्यवथित एकत्र करून फ्रीझरला किमान ३० मिनिटे ठेवा.
  6. नंतर त्याचे स्कूप करून त्यावर उर्वरित खजुराचे आणि बदामाचे तुकडे पसरवा.
  7. त्यावर चेरी ठेऊन  सजवा आणि आपल्या बच्चा कंपनीला खुश करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर