मुख्यपृष्ठ / पाककृती / Wheat grass juice

Photo of Wheat grass juice by Swati Kolhe at BetterButter
0
6
4.5(2)
0

Wheat grass juice

Mar-08-2018
Swati Kolhe
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Wheat grass juice कृती बद्दल

आजपर्यंत आपण अख्खा गहू, दलिया याचे महत्व आणि त्यानुसार त्याच्या रेसिपीस पाहिल्यात. पण तसे पाहता गव्हाच्या पानांकडे दुर्लक्षच झालेले आहे. आपल्यापैकी बर्याच महिलांना माहीत ही नसेल याचे महत्व. चला तर पटापट पाहून घेऊयात. १.गहू पानांच्या ज्यूसमध्ये मोठया प्रमाणात पोषक तत्व असल्यामुळे, हे पोषकतत्व आपल्या शरीरातील tissue ना वाढवण्यासाठी मदत करते व लाल पेशी वाढवते त्यामुळे कॅन्सर चा धोका टाळू शकतो. २. या ज्यूस मधले chlorophyll हे आपले आतील व बाहेरील स्वास्थ्य चांगले राहून राहण्यासाठी मदत करते. ३.हिमोग्लोबिन वाढवते. ४.ब्लड शुगर लेवल मध्ये ठेवण्यास फायदेशीर आहे. ५. वाढणाऱ्या वयामुळे येणाऱ्या सुरकुत्या आणि पांढरे केस होण्यापासून वाचवते. ६.रक्त आणि लिव्हर साफ होण्यात मदत करते. ७.हृदयाच्या स्वास्थ्यासाठी चांगले आहे. ८. या ज्यूस मधून आपल्याला व्हिटॅमिन A, B, C आणि E मिळते तसेच मॅग्नेशिअम, आयर्न, कॅल्शिअम, झिंक आणि अमिनो ऍसिड मिळते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. गव्हाची पान ३० ग्राम साधारण
 2. सफरचंद १ मध्यम
 3. लिंबाचा रस १/२ tsp
 4. अननसाचे तुकडे १/२ कप
 5. अद्रक १/२"

सूचना

 1. पद्धत १
 2. गव्हाची पान ज्यूस च्या भांड्यात घालून २-३ वेळा फिरवून घ्यावे
 3. मग त्यात सफरचंदाचे तुकडे करून घालावे.
 4. शेवटी लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून चांगले एकजिव होईपर्यँत फिरवून घ्यावे.
 5. वरील ज्यूस गाळणीने गाळून घ्यावा.
 6. पद्धत २
 7. गव्हाची पान ज्यूस च्या भांड्यात घालून २-३ वेळा फिरवून घ्यावे.
 8. मग त्यात अननसाचे तुकडे, अद्रक व थोडे पाणी घालून फिरवून घ्यावे.
 9. वरील ज्यूस गळणीने गाळून घ्यावा.
 10. टीप: गहू २४ तास पाण्यात भिजत घालून मग ते उपसून सुती कापडात २४ तास गरम जागी ठेवावे. मोड आल्यावर पसरत कुंडी मध्ये हे गहू टाकून ठेवून थोडे पाणी फवारावे. साधारण ८-९ दिवसात पान वाढायला लागतात.
 11. टीप: साधे गहू कुंडीत टाकून दिल्यावर सुद्धा पान येतात पण यासाठी खूप दिवस लागतात.
 12. ही रेसिपी आहार विशेषज्ञ यांनी सांगितले आहे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Archana Lokhande
Mar-08-2018
Archana Lokhande   Mar-08-2018

Very nice

Chayya Bari
Mar-08-2018
Chayya Bari   Mar-08-2018

खरंच पौष्टीक!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर