Photo of Mix vhejitable clear sup by pranali deshmukh at BetterButter
469
13
0.0(1)
0

Mix vhejitable clear sup

Mar-10-2018
pranali deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Mix vhejitable clear sup कृती बद्दल

आपलं दैनंदिन रुटीन इतकं बिझी असतं कि स्वतःसाठी वेळच मिळत नाही त्यातही खाण्यापिण्यात रोज सर्व व्हिटॅमिन प्रोटिन्स आपणाला मिळतातच असे नाही .पण रोज एकवेळ मिक्स व्हेज सूप घेतलं तर नक्कीच ती भर निघून येईल .तुमची त्वचा चमकेल , तुम्ही फ्रेश फील कराल ,शिवाय वजनही आटोक्यात राहील .आपण बरेचदा भाज्यांची देठं ,काड्या ,टरफल टरफलं फेकून देतो .मुळात त्या टरफलामध्ये ,देठामध्ये जीवनसत्व लपलेली असतात .जर त्याचा वापर करून आपण सूप बनवले तर ? कितीतरी प्रोटिन्स ,व्हिटॅमिन्स आपल्याला मिळतील .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • सूप
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. पालकाच्या दांड्या 7-8
  2. मेथीच्या काड्या 5-6
  3. फुलगोबीचे देठ चिरून 1/4 कप
  4. मटारचे टरफलं 5-6
  5. 1 कांदा चिरून
  6. 1 गाजर तुकडे करून
  7. पत्ताकोबी 1/4 कप चिरून
  8. अद्रक 1 इंच तुकडे करून
  9. लसूण पाकळ्या दोन जाडसर चिरून
  10. दुधी भोपळा 3 चमचे छोट्या फोडी
  11. मटार 3 चमचे
  12. फुलगोबी 4 चमचे बारीक चिरून
  13. बीन्स स्प्राऊट्स 1/4 कप
  14. गाजर 3 चमचे बारीक चिरून
  15. फरस बी 4 चमचे चिरून
  16. पुदिना 5-6 पान
  17. मीठ
  18. हळद 1/2 tbsp
  19. तेल किंवा गाईचे तूप 1/2 tbsp
  20. लिंबू रस 1 tbsp
  21. मीर पूड 1 tbsp

सूचना

  1. सगळया भाज्या धुवून घ्या.
  2. आता 10 मिनिट पाण्यात बॉईल करा
  3. पाणी गाळून घ्या आणि त्यामधील पत्ताकोबी ,गाजर ,लसूण ,अद्रक ,वेगळे काढून मिक्सरमधून वाटून घ्या .
  4. आपण सूप बनवताना दाटपणा येण्याकरिता कॉर्नफ्लोर वापरतो पण इथे आपण वरील भाज्यांचे वाटण दाटपणा आणण्यासाठी उपयोगात आणू .
  5. पॅन मध्ये तूप टाका आता ,गाजर ,कोबी ,मटार ,बीन्स स्प्राऊट्स ,फरस बी ,भोपळा पुदिना अगदी दोन मिनिट परतवा.
  6. खूप शिजवायचं नाही .थोडं परतवा , हळद ,मीठ घाला आणि एक वाफ काढा .
  7. आता पॅन मध्ये जे भाज्यांचं पाणी गाळलं होतं ते टाका त्यामध्ये मिक्सरमधून फिरवलेल्या भाज्या ऍड करा .एक उकळी येऊ द्या.
  8. आता परतवलेल्या भाज्या ऍड करा.एक उकळी काढायची आहे .
  9. गरम गरम सर्व्ह करताना लिंबाचा रस आणि मिरपूड ऍड करा छान मिक्स करा आणि पौष्टिक सूप चा आनंद घ्या .
  10. पौष्टिक पदार्थ चवीसोबत दिसायलाही आकर्षक असले कि लहान मुलंही आवडीने आकर्षित होतात .सूपमध्ये भाज्यांचा नैसर्गिक रंग सूपला हेल्दी ,टेस्टी ,आणि देखणं बनवतो.शिवाय लिंबू ,पुदिना मुळे अप्रतिम चव येते . पालक ,मेथीचा अर्क उतरतो .
  11. जास्तीत जास्त जीवनसत्वे तुम्हाला या सूप मधून मिळतील .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-10-2018
deepali oak   Mar-10-2018

पौष्टिक A1 pick

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर