मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा आना (रिंग)

Photo of Potato anna (Ring) by Aarti Nijapkar at BetterButter
590
7
0.0(0)
0

बटाटा आना (रिंग)

Mar-13-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा आना (रिंग) कृती बद्दल

अगदी सोपी अशी ही पाककृती आहे कमी वेळात आणि कमी साहित्य वापरून करता येणारी पार्टीसाठी खास बटाटा आना (रिंग)

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्रेंच
  • सिमरिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे मोठे ३ ते ४
  2. बटर २ मोठे चमचे
  3. काळीमिरी कुटलेली १ मोठा चमचा
  4. लाल तिखट १/२ लहान चमचा
  5. मीठ स्वादानुसार
  6. कोथिंबीर सजावटीसाठी

सूचना

  1. बटाटे स्वच्छ धुवून घ्या त्याची साली काढून घ्या मग पातळ कापा किंवा सलायसर मध्ये पातळ कापून पाण्यात मिठाच्या पाण्यात ठेवून ध्या
  2. आता एक पॅन ठेवा तापवून मंद आच करून घ्या मग त्यावर १ चमचा बटर घाला व तव्यावर पसरवून घ्या आता पाण्यातून बटाट्याचे स्लाइस काढून घ्या पाणी पूर्णपणे काढून टाका व तव्यावर गोलाकार ठेवून द्या त्या बटाट्याच्या रिंग वर मीठ , काळीमिरी पावडर घालून झाकण ठेवून एका बाजूने शिजवून घ्या ४ ते ५ मिनिटे
  3. एका बाजूने शिजल्यावर आता आपल्याला बटाटे पातलायचे आहते आणि बटाट्याची रिंग न तुटता तर तव्यावर उलटी व्यवस्थित राहणारी थाळी घ्या ती उलटी तव्यावर ठेवा व पॅन पलटी करून रिंग थाळीत घ्या आणि मग पॅन गॅस वर ठेवून उरलेले बटर घालून पसरवून घ्या थाळीत घेतलेले बटाटे रिंग अलगद पॅन मध्ये घाला व वरून मीठ आणि काळीमिरी पावडर भुरभुरून पुन्हा झाकण ठेवून वाफवून घ्या
  4. तयार झालेल्या बटाटा रिंग वर लाल तिखट घाला व चिरलेली कोथिंबीर घाला
  5. बटाटा आना रिंग तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर