Photo of Idlee by Maya Ghuse at BetterButter
468
6
0.0(1)
0

Idlee

Mar-13-2018
Maya Ghuse
1440 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • आंध्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ 3 वाटी
  2. उडीद डाळ 1 वाटी
  3. भात 3 चमचे
  4. चना डाळ अर्धी वाटी
  5. तूर डाळ अर्धी वाटी
  6. वांग 1
  7. चिंच 3-4 बीया
  8. सांभारमसाला 1 चमचा
  9. तिखट 1 चमचा
  10. हळदं अर्धा चमचा
  11. धना पावडर पाव चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. सोडा अर्धा चमचा
  14. तेल 1 चमचा
  15. जिरं अर्धा चमचा
  16. कढीपत्ता
  17. कोथिंबीर

सूचना

  1. तांदूळ, उडद डाळ वेग-वेगळे पाण्यात भिजत घातली त्यात 8-10 मेथी दाणे टाकले 8 तास भीजू दिलेे
  2. नंतर मिक्सरमधून बारीक वाटले,वाटतांना 3 चमचे भात ही वाटून त्यात टाकला, रात्रभर झाकून ठेवले
  3. सकाळी कूकरमध्ये चनाडाळ, तूर डाळ पाण्याने धूवून टाकली त्यात 1 चमचा उडद डाळ, वांगे,टमाटे चिरून टाकले, सांभारमसाला ,धना पावडर,तिखट,हळद टाकून 3 शिट्टया होतपर्यंत शिजवून घेतलं
  4. नंतर कढण्यात तेल तापवून त्यात जिरं, कढीपत्ता टाकून ते शिजलेल्या वरणावर टाकले नंतर चिंचेच पाणी टाकून उकळवून वरून कोथिंबीर घातली -सांबार तयार झाला
  5. डाळ तांदूळाच्या मिश्रणात मीठ व सोडा टाकून, इडलीपात्राला तेल लावून त्यात मिश्रण टाकले 10-15मी ऩंतर शिजलेल्या इडली काढली
  6. आणि वाढली इडली-सांभार, दह्याच्या चटणी बरोबर

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-13-2018
Chayya Bari   Mar-13-2018

Looks spongy!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर