मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रॉकोली चीझ फ्रिटर्स

Photo of Broccoli Cheese Fritters by Sanika SN at BetterButter
415
3
0.0(0)
0

ब्रॉकोली चीझ फ्रिटर्स

Mar-22-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रॉकोली चीझ फ्रिटर्स कृती बद्दल

पाैष्टिक व सोपी पाककृती

रेसपी टैग

  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रॉकोलीच्या एका गड्ड्याचे तुरे काढून रफली चिरुन घेणे
  2. १ अंडे
  3. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. २-३ लसूण बारीक चिरलेले
  5. १/२ टीस्पून काळी-मिरीपूड
  6. १ टीस्पून मिक्स ड्राईड हर्ब्स
  7. १/२ वाटी चीझ (कुठलेही चालेल, आवडीप्रमाणे घ्यावे)
  8. मैदा बाईंडिंगसाठी
  9. मीठ चवीप्रमाणे

सूचना

  1. ब्रॉकोलीला वाफवून घेणे किंवा मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात थोडे पाणी स्प्रेकरुन हाय पॉवरवर ३-४ मिनिटे वाफवून घ्या.
  2. वाफवलेल्या ब्रॉकोलीला मॅशरने मॅश करुन घ्या.
  3. दुसर्‍या भांड्यात अंडे फोडून घ्या, त्यात चिरलेला लसूण, चिरलेली मिरची,हर्ब्स, काळी-मिरीपूड व मीठ घालून फेटॄन घ्या.
  4. हे अंड्याचे मिश्रण, चीझ व थोडा मैदा ब्रॉकोलीच्या मिश्रणात घालून चांगलेएकजीव करा.
  5. तळहातावर छोटा गोळा घेउन त्याचे पॅटिस तयार करा.
  6. नॉन-स्टीक तव्यावर थोडे तेल गरम करून तयार पॅटिस दोन्ही बाजूंनी खमंगशॅलो फ्राय करावे. 
  7. हे ब्रॉकोली फ्रिटर्स तुम्ही मिंट-योगर्ट डिप आणि टोमॅटो सॉससोबत गरमचंसर्व्ह करा. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर