मुख्यपृष्ठ / पाककृती / मटण स्टूव

Photo of Mutton stew by Aarti Nijapkar at BetterButter
276
4
0(0)
0

मटण स्टूव

Mar-22-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण स्टूव कृती बद्दल

अगदी सोपी अशी पाककृती आणि पौष्टिक कधीही आणि कोठेही खाल्ली जाणारी आरोग्यासाठी चांगली अशी ही पाककृती अर्थात जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी शाकाहारी तुम्हाला आवडत्या भाज्या वापरून करू शकता

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मटण चे बारीक तुकडे२५० ग्रॅम
  2. बटाटे लहान आकाराचे २ ते ३
  3. गाजर १ लहान
  4. कांद्याची पात १ दांडी
  5. कांदा १ मध्यम
  6. काळीमिरी १ लहान चमचा
  7. मिक्स हब्स १ लहान चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल १ लहान चमचा
  10. पाणी गरजेनुसार

सूचना

  1. मटण स्वच्छ धुवून कुकर मध्ये शिजवून घ्या मग गाजर , कांदा क्यूब मध्ये कापून घ्या
  2. गाजर , लहान बटाटे , उकळून घ्या गाजर व बटाटे शिजले की झाऱ्याने गाजर व बटाटे काढून घ्या आणि ते स्टॉक ठेवून फेकू नये हे वापरायचे आहे
  3. पॅन मध्ये थोडं तेल किंवा बटर घालून कांदा परतवून घ्या मग गाजर घाला हेही परतवून घ्या
  4. आता शिजलेले मटण व त्यातील पाणी घाला चवीनुसार मीठ , कुटलेली काळीमिरी व मिक्स हर्ब्स घालून उकळी येऊ द्या
  5. आता शिजलेले बटाटे व कांद्याची पात घाला स्टिव एकजीव करून व गॅस बंद करा
  6. एका बाउल किंवा सूप च्या डिश मध्ये काढून घ्या व कांद्याच्या पाताने सजावट करा
  7. हे मटण स्टिव गरमागरम च प्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर