मुख्यपृष्ठ / पाककृती / डोरेमोन केक(चाँकलेट केक इन आप्पे)

Photo of Doremon Cake(Chocolate cake in Appam pan) by Archana Lokhande at BetterButter
1655
6
0.0(0)
0

डोरेमोन केक(चाँकलेट केक इन आप्पे)

Mar-23-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डोरेमोन केक(चाँकलेट केक इन आप्पे) कृती बद्दल

डोरेमोन केक हे मुलाने सुचवलेले नाव आहे. कारण डोरेमोनला जो केक आवडतो तो अशाच दिसतो म्हणून.....किड्स पार्टी म्हटले की केक असलाच पाहिजे.. हल्ली पार्टीत केक आणि आईस्क्रीम मेन असते... आणि ही झटपट होणारी डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • बेकिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा १ कप
  2. दही १ कप
  3. पिठीसाखर ३/४ कप
  4. बेकिंग पावडर १ चमचा
  5. बेकिंग सोडा १/२ चमचा
  6. कोको पावडर ४ चमचे
  7. मीठ १ चिमूट
  8. व्हेनिला इन्सेंस १ चमचा
  9. दुध १/२ कप
  10. बटर १/२ कप(किंचित गरम करून वितळून घेणे)

सूचना

  1. प्रथम चाळणीत मैदा, बेकिंग पावडर, सोडा, कोको पावडर, मीठ घालून १-२ वेळा चाळून घ्या.
  2. एका बाऊलमध्ये बटर,पिठीसाखर आणि दही घालून छान मिक्स करून घ्या.
  3. नंतर त्यात व्हेनिला इन्सेंस घालून मिक्स करून चाळलेले पीठ घालून मिक्स करून घ्या.
  4. नंतर त्यात थोडे थोडे करून दुध घालून मिक्स करून छान बँटर तयार करून घ्या.
  5. आता आप्पे पँन गँसवर ठेवून त्यात तयार बँटर घालून ५-७ मिनिटे झाकण ठेवून द्या.
  6. केक अशा छान फुगतो.
  7. नंतर केक पलटून ५ मिनिटे झाकण ठेवून द्या.
  8. केक थोडा थंड झाल्यावर आप्पे पँनमधून काढून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर