Photo of khichdi bhaji by Aarti Nijapkar at BetterButter
1270
5
0.0(0)
0

खिचडी भजी

Apr-07-2018
Aarti Nijapkar
25 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचडी भजी कृती बद्दल

खिचडी भजी म्हणजे तांदूळ मुगाची आपण मुलांसाठी करतो ती खिचडी पण त्यात काही भाज्या वापरल्या आहेत म्हणजे दुधी भोपळा , गाजर ,टोमॅटो इत्यादि वापरून मग खिचडी केली मग त्याच्या भज्या केल्या...खूप सोपी आणि पौष्टिक अशी पाककृती माझ्या मुलांसाठी बनवलेली पाककृती आणि घरात मोठ्या मंडळींना सुद्धा आवडली बरं का! तर तुम्हीही नक्की करून पहा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. खिचडी
  2. तांदूळ १/३ वाटी
  3. मुगाची डाळ १ मोठा चमचा
  4. दुधी भोपळा ४ ते ५ तुकडे
  5. टोमॅटो १ लहान
  6. गाजर कापलेले ७ ते ८ तुकडे
  7. पालक बारीक चिरलेली ४ पाने
  8. कोथिंबीर १ लहान चमचा
  9. लसूण पाकळ्या १ ते २
  10. मीठ स्वादानुसार
  11. हळद १/४ लहान चमचा
  12. तूप १/२ लहान चमचा
  13. पाणी गरजेनुसार
  14. भजींसाठी
  15. तयार खिचडी
  16. पालक बारीक चिरलेली ५ ते ६ पाने
  17. कांदा बारीक चिरलेला १ लहान
  18. कोथिंबीर बारीक चिरलेली १ लहान चमचा
  19. जिरे १/४ लहान चमचा
  20. लाल तिखट १/४ लहान चमचा
  21. गरम मसाला १/२ लहान चमचा
  22. बेसन १/४ वाटी
  23. कॉर्न फ्लोअर २ मोठे चमचे
  24. तांदूळ पीठ १ मोठा चमचा
  25. मीठ चवीनुसार
  26. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम खिचडी बनविण्यासाठी तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घ्या व कूकर मध्ये घाला व गरजेनुसार पाणी घाला मग दुधी भोपळा , गाजर , टोमॅटो , पालक , कोथिंबीर , लसूण , मीठ , हळद , तूप घालून एकत्र करा ४ ते ५ शिट्या होऊ द्या तयार खिचडी गार करून घ्या
  2. आता तयार खिचडीत चिरलेली पालक , कांदा , कोथिंबीर , घाला जिरे , लाल तिखट , गरम मसाला ,बेसन , कॉर्न फ्लोअर , तांदळाचे पीठ घालीन मिश्रण एकजीव करून घ्या
  3. आता कढईत तेल तापवून घ्या मग मंद आचेवर खिचडीचे भज घाला बोटांनी किंवा चमचा वापरला तरी चालेल
  4. मध्यम आचेवर टाळून घ्या चांगले सोनेरी रंग होईपर्यंत तळा
  5. आता गरमागरम खिचडीचे भजी तयार आहेत सॉस सोबत किंवा नुसते असेही छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर