बर्गर | Barger Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  18th Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Barger by Teesha Vanikar at BetterButter
बर्गरby Teesha Vanikar
  • तयारी साठी वेळ

    45

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

बर्गर recipe

बर्गर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Barger Recipe in Marathi )

  • ३ ऊकडलेले बटाटे
  • १/२ वाटी मैदा
  • ४ चमचे कॉर्नफ्लावर
  • ४ चमचे भिजवलेले पोहे
  • १/२ वाटी मटार
  • १ चमचा जीरे पुड
  • १ चमचा धणेपुड
  • १ चमचा पिवळी सुकी मिरचीपुड
  • १ चमचा गार्लीकपुड
  • १/२ चमचा हळद
  • २ चमचे बटाटे
  • ५ चमचे ब्रेड क्रम्स
  • १/२ चमचा बेकिंग पावडर
  • २चमचे टोमँटो कँचअप
  • ३ चमचे मेयो सॉस
  • रेड कलर
  • ३ बन पाव
  • मीठ

बर्गर | How to make Barger Recipe in Marathi

  1. कढईत बटर टाका व मेल्ट झाल्यावर त्यात मटर घाला
  2. मटर परतुन झाल्यावर त्यात स्मँश केलेले बटाटे ,पोहे व सर्व मसाले घाला
  3. परतुन झाल्यावर २ मि झाकण ठेवा व गँस बंद करा
  4. भाजी थंड झाल्यावर स्मँश करुन टिक्की बनवुन किवां प्लस्टीक रँप मध्ये गुंडाळुन १० मि. फ्रिजमध्ये ठेवा
  5. टमाट्याच्या चकत्या वेगळ्या व कांद्याच्या चकत्या पाणी घालुन फ्रिजमध्ये १० मि. ठेवा
  6. २ चमचे कॉर्नफ्लोवर घेवुन त्यात बेकिंग पावडर घालुन बाजुला ठेवा
  7. मोठ्या वाटीत मैदा,कॉर्नफ्लोवर,मीठ घेवुन भजीच्या पिठासारखे भिजवुन घ्या
  8. मँक डी सारखा ऑरेंन्ज सॉससाठी मेयो सॉस व कँचअप ऐकत्र करा व थोडा रेड कलर टाकुन रेडी झाला ऑरेन्ज सॉस
  9. फ्रिजमधुन रोल काढुन त्याच्या टिक्क्या कापा कॉर्नफ्लोवरमध्ये दोन्ही बाजुने बुडवा
  10. नंतर मैद्याच्या मिश्रणात डिप करा व ब्रेडक्रम्स मध्ये घोळुन गोल्डन फ्राय करा
  11. बन पावचे २ भाग करुन बटर लावुन दोन्हीबाजुने शेकुन घ्या
  12. पावाच्या टॉपच्या भागावर ऑरेन्ज सॉस टाका त्यावर कांद्याच्या चकत्या व टमाट्याच्या चकत्या ठेवा
  13. नंतर तयार टिक्की ठेवुन दुसरा बनपावाचा भाग वरुन ठेवा
  14. बर्गर रेडी टु सर्व्ह

Reviews for Barger Recipe in Marathi (0)