मुख्यपृष्ठ / पाककृती / कडी भात

Photo of Kadi Bhaat by Aarti Nijapkar at BetterButter
2
8
0(0)
0

कडी भात

Apr-23-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडी भात कृती बद्दल

सोपी आणि पचायला उत्तम अशी ही पाककृती आणि प्रत्येक घराघरांत विविध प्रकारे ही कडी बनविण्यात येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. दही १/२ वाटी
  2. पाणी २ ग्लास
  3. हळद १ मोठा चमचा
  4. तेल १ लहान चमचा
  5. मोहरी १/४ लहान चमचा
  6. जिरे १/२ लहान चमचा
  7. कडीपत्ता ५ ते ६ पाने
  8. हिंग १/४ लहान चमचा
  9. लसूण बारीक चिरलेली १ लहान पाकळी
  10. कांदा बारीक चिरलेला १ लहान
  11. बेसन १ मोठा चमचा
  12. कोथिंबीर चिरलेली १ लहान चमचा
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. दही , पाणी आणि हळद हे व्यवस्थित फेटून घ्या रविचा वापर करून चांगले गोठून घ्या
  2. एका कढईत तेल गरम करा मग मोहरी आणि जिरे घाला तडतडले की हिंग , कडीपत्ता घाला
  3. लसूण ठेचा व तेलात घालून परतवा आता चिरलेला कांदा घाला पारदर्शक होईपर्यंत परतवून घ्या
  4. आता बेसन घालून व्यवस्थित मंद आचेवर परतवून घ्या
  5. दह्याचं मिश्रण म्हणजेच तयार केलेलं ताक हे घाला चांगले ढवळून घ्या व उकळी येऊ द्या
  6. चवीनुसार मीठ , हिरवी मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घाला ५ते ६ मिनिटे उकळवून घ्या
  7. गरमागरम कडी तयार आहे भातासोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर