मुख्यपृष्ठ / पाककृती / Ghosalyache Bharit - Gilki Raita

Photo of Ghosalyache Bharit - Gilki Raita by Sudha Kunkalienkar at BetterButter
1
6
5(2)
0

Ghosalyache Bharit - Gilki Raita

May-03-2018
Sudha Kunkalienkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Ghosalyache Bharit - Gilki Raita कृती बद्दल

मला वाटत होतं घोसाळ्याचे भरीत छान होईल. एक - दोन रेसिपीज पहिल्या पण आवडल्या नाहीत. म्हणून स्वतः च रेसिपी बनवली. घोसाळ्याला खूप पाणी सुटतं. म्हणून भरीत करायच्या आधी ते पाणी सुकवलं तर चांगलं होईल असं वाटलं. आणि घोसाळ्याला लसणीचा वास छान लागतो. मग चरचरीत लसणीची फोडणी दिली शेवटी. मस्त टेस्टी झाले भरीत. तुम्हीही करून बघा.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. घोसाळी ३ मध्यम
 2. शेंगदाण्याचे जाडसर कूट १ मोठा चमचा
 3. दही १ मोठा चमचा
 4. मिरची ठेचून अर्धा चमचा
 5. तूप १ चमचा
 6. जिरं पाव चमचा
 7. हिंग चिमूटभर
 8. हळद चिमूटभर
 9. लसूण २ पाकळ्या तुकडे करून
 10. साखर अर्धा चमचा
 11. नारळ १ चमचा
 12. कोथिंबीर १ चमचा
 13. मीठ चवीनुसार

सूचना

 1. घोसाळी सोलून किसून घ्या.  
 2. एका पातेल्यात अर्धा चमचा तूप घालून जिरं, हिंग आणि हळद घालून फोडणी करा.  
 3. त्यात किसलेले घोसाळे घाला. 
 4. मध्यम आचेवर परतून घ्या. घोसाळ्यातलं पाणी सुकायला पाहिजे.  
 5. शिजलेलं घोसाळं गार करून घ्या.  
 6. त्यात शेंगदाणा कूट, नारळ, कोथिंबीर, मिरची, मीठ, साखर आणि दही घालून मिक्स करा.  
 7. आता उरलेलं अर्धा चमचा तूप गरम करा. त्यात लसणीचे तुकडे घालून लालसर रंगावर परतून घ्या. 
 8. ही फोडणी मिश्रणावर घाला आणि सर्व्ह करा टेस्टी घोसाळ्याचे भरीत. 
 9. पोळी, भाताबरोबर किंवा असंच खायला ही छान लागतं.    

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-03-2018
Nayana Palav   May-03-2018

Wow

Poonam Nikam
May-03-2018
Poonam Nikam   May-03-2018

खुप छान नवीन प्रकार

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर