फणसाच्या घाऱ्या | Fansachya Gharya Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  12th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fansachya Gharya recipe in Marathi,फणसाच्या घाऱ्या, Vaishali Joshi
फणसाच्या घाऱ्याby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

फणसाच्या घाऱ्या recipe

फणसाच्या घाऱ्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fansachya Gharya Recipe in Marathi )

 • १० -१२ पिकलेले फणसाचे गरे
 • १ वाटी चिरलेला गुळ
 • चमचाभर तिळ
 • लागेल तेवढी कणिक
 • चिमुटभर मीठ
 • मोहन आणि तळण्या साठी तेल

फणसाच्या घाऱ्या | How to make Fansachya Gharya Recipe in Marathi

 1. पिकलेल्या फणसाच्या गरयान मधून बिया काढून घ्या
 2. गर आणि गुळ चिमुटभर मीठ घालून मिक्सर मधून बारीक़ करून घ्या
 3. त्यात मावेल एवढी कणीक , १/४ वाटी गरम तेलाचे मोहन आणि तिळ घालून पीठ घट्ट मळून घ्या
 4. थोड्या वेळ झाकून ठेवा
 5. मळलेल्या पिठाचे गोळे करून लाटून घ्या आणि गोल आकारात वाटीने कापून घ्या
 6. मीडियम फ्लेम वर तेलात तळून घ्या
 7. बस थंड झाल्यावर खायला तयार

Reviews for Fansachya Gharya Recipe in Marathi (0)