BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो चटणी

Photo of Tomato Chatni by Deepa Gad at BetterButter
328
6
0(0)
0

टोमॅटो चटणी

May-16-2018
Deepa Gad
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो चटणी कृती बद्दल

प्रथम ३ मोठे कांदे व ४ मोठे टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल मोठे २ चमचे घालून मोहरी, कढीपत्ता, कांदा चिरलेला टाकून चांगला परता. नंतर त्यात मालवणी मसाला १ चमचा, धनेजिरे पावडर अर्धा चमचा घालून परता. टोमॅटो चिरलेला घाला, मीठ घालून परता झाकण ठेवून एक वाफ काढा, टोमॅटो थोडा मऊ झाला पाहिजे, वरून कोथिंबीर पेरा, चपाती, भाकरी सोबत सर्व्ह करा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. कांदे ३ मोठे
  2. टोमॅटो ४ मोठे
  3. मालवणी मसाला १ चमचा
  4. धनेजिरे पावडर अर्धा चमचा
  5. मोहरी १ चमचा
  6. कढीपत्ता १० पाने
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल
  9. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम कांदे व टोमॅटो चिरून घ्या
  2. कढईत तेल घालून त्यात मोहरी, कढीपत्ता, चिरलेले कांदे घालून चांगले परता
  3. नंतर त्यात मालवणी मसाला, धनेजिरे पावडर, मीठ घालून परता
  4. टोमॅटो चिरलेले घाला, एकजीव करून झाकण ठेवून एक वाफ काढा, टोमॅटो थोडे मऊ झाले पाहिजे इतकेच शिजवा
  5. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर