मुगाचे शेजवान पॉपकॉर्न | Moong shejwan popcorn Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  16th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Moong shejwan popcorn recipe in Marathi,मुगाचे शेजवान पॉपकॉर्न, Deepa Gad
मुगाचे शेजवान पॉपकॉर्नby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

5

0

मुगाचे शेजवान पॉपकॉर्न recipe

मुगाचे शेजवान पॉपकॉर्न बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong shejwan popcorn Recipe in Marathi )

 • मुगडाळ २५० ग्रॅम
 • आलं १ इंच
 • लसूण पाकळ्या ४-५
 • शेजवान सॉस २ चमचे
 • सोया सॉस १ चमचा
 • तांदळाचे पीठ २ चमचे
 • पोहे २ चमचे
 • कोथिंबीर २ चमचे
 • हिंग चिमूट
 • हळद अर्धा चमचा
 • सिमला मिरची १
 • गाजर १
 • हिरवी व लाल मिरची प्रत्येकी २-२
 • मीठ चवीनुसार

मुगाचे शेजवान पॉपकॉर्न | How to make Moong shejwan popcorn Recipe in Marathi

 1. मुगडाळ ४ तास पाण्यात भिजवत ठेवा.
 2. मिक्सरमध्ये भिजवलेली मुगडाळ, आलं- लसूण, हिरवी- लाल मिरची,थोडं पाणी घालून जाडसर वाटा
 3. बाऊलमध्ये मिश्रण काढून त्यात शेजवान सॉस, सोया सॉस, पोहे, तांदूळ पीठ, कोथिंबीर, हिंग, हळद, सिमला मिरची बारीक चिरलेला, गाजर किसलेल, मीठ घालून सर्व एकजीव करा
 4. त्या मिश्रणाचे बॉल्स बनवून तेलात तळा.
 5. शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

My Tip:

यात तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता

Reviews for Moong shejwan popcorn Recipe in Marathi (0)