वेजिटेबल मुगलाई पुलाव | Vegetable muglai pulav Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vegetable muglai pulav recipe in Marathi,वेजिटेबल मुगलाई पुलाव, priya Asawa
वेजिटेबल मुगलाई पुलावby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

वेजिटेबल मुगलाई पुलाव recipe

वेजिटेबल मुगलाई पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetable muglai pulav Recipe in Marathi )

 • बासमती तांदुळ 2 वाटी
 • चांगले तुप 2 चमचे
 • लांब कापलेल्या मिक्स भाज्या ( कांदा, बटाटा, फुलवर, शिमला मिर्ची, ओले वटाने, गाजर , इ.)
 • तमालपत्र 2
 • कढीपत्ता 5-6 पान
 • 1 टमाटा , लसुण च्या पाकळ्या 5-6, पुदिनयाचे 5-6 पान मिक्सर मधुन एकजीव करून घ्या
 • लाल तिखट 1 चमचा
 • हळद 1/2 चमचा
 • गरम म्हसाला 1/2 चमचा
 • कच्चा म्हसाला 1/2 चमचा
 • शहाजीरा 1 चमचा
 • किसलेला खोबरा वरुन टाकण्यासाठी
 • कोथिंबीर बारीक चिरलेली 2 चमचे
 • मीठ साखर चवीनुसार

वेजिटेबल मुगलाई पुलाव | How to make Vegetable muglai pulav Recipe in Marathi

 1. तांदुळ धोऊन पाणी काढून घ्या त्याच्यात 4 वाट्या पाणी व मीठ टाकून भात शिजवून घ्या
 2. एका ताटात तयार भात पसरुन गार करायला ठेवा
 3. शिल्लक तुपा मध्ये शहाजीरा , तमालपत्र व कढीपत्ता टाकून फोडणी द्या
 4. त्याच्यात मिक्सर मधुन काढलेली ग्रेव्ही टाका व तुप सुटेपर्यंत भाजुन घ्या
 5. सगळ्या मिक्स कापलेल्या भाज्या परतून व झाकण ठेवून वाफवून घ्या
 6. लाल तिखट, हळद, गरम म्हसाला, कच्चा म्हसाला, मीठ व साखर टाकून थोडे परतुन घ्या
 7. आता शिजवून घेतलेले भात व तळून घेतलेला कांदा घालून मिक्स करून 2 मिनिट वाफवून घ्या
 8. तयार झालेला पुलाव सर्वींग प्लेट मध्ये घेउन कोथिंबीर व खोबऱ्याचे किसने सजवून गरमागरम पुलाव सर्व करा
 9. तुपा मध्ये कापलेला कांदा लालसर तळून काढुन घ्या

Reviews for Vegetable muglai pulav Recipe in Marathi (0)